काय सांगता? 14 वर्षांच्या मुलीने दिला बाळाला जन्म, Video शेअर करत सांगितला 'तो' अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 16:27 IST2023-01-25T16:19:32+5:302023-01-25T16:27:03+5:30

विद्यार्थिनीने वयाच्या 14 व्या वर्षी गरोदर राहण्याचा आणि मुलाला जन्म देण्याचा तिचा अनुभव शेअर केला आहे.

pregnant in 14 years become mother at 15 years girl mother congratulated viral video | काय सांगता? 14 वर्षांच्या मुलीने दिला बाळाला जन्म, Video शेअर करत सांगितला 'तो' अनुभव

फोटो - आजतक

एका विद्यार्थिनीने वयाच्या 14 व्या वर्षी गरोदर राहण्याचा आणि मुलाला जन्म देण्याचा तिचा अनुभव शेअर केला आहे. लहान वयातच जेव्हा मुलीला प्रेग्नेंसीची माहिती मिळाली तेव्हा तिला धक्काच बसला. आता मुलीचे वय 17 वर्षे आहे. मुलीने सांगितले- जेव्हा आईला तिच्या प्रेग्नेंसीबद्दल कळले तेव्हा सुरुवातीला ती दु:खी होती, मात्र नंतर तिने पूर्ण साथ दिली. व्यवसायाने व्हिडीओ क्रिएटर असलेल्या मुलीचे यूट्यूबवर तब्बल 2 लाखांहून अधिक सब्सक्राइबर्स आहेत.

17 वर्षीय डेस्टिनीने सांगितले की, तिने आपली प्रेग्नेंसी बऱ्याच काळापासून कुटुंबापासून लपविण्याचा प्रयत्न केला. 14 व्या वर्षी गर्भवती राहिल्यानंतर ती 15 व्या वर्षी आई झाली. तिने सर्वप्रथम तिच्या प्रेग्नेंसीची माहिती तिची बहिण डिवाइनला दिली होती. त्यावेळी बहिणीने रागाच्या भरात अनेक गोष्टी सांगितल्या. जेव्हा डेस्टिनीने तिची आई लेइलानीला प्रेग्नेंसीबद्दल सांगितलं तेव्हा ती सुरुवातीला दुःखी होती. आमच्या नात्यात खूप बदल झाला. 

गरोदरपणाबद्दल कळल्यावर आईला राग येईल असं डेस्टिनीला वाटलं पण आईने तिचे अभिनंदन केले. हे पाहून डेस्टिनीलाही आश्चर्य वाटले, कारण तिची आई लहानपणापासूनच तिच्याबाबत खूप कडक होती. आईने तिला खूप साथ दिल्याचे डेस्टिनीने सांगितले. आई अशी प्रतिक्रिया देईल याची कल्पनाही नसल्याचं सांगितलं. व्हिडिओमध्ये एक क्षण असा आहे जेव्हा डेस्टिनीची आई तिच्या प्रेग्नेंसीबाबत भावूक झाली आणि रडू लागली.

डेस्टिनीने  सांगितले की, ती लोकांना लहान वयात गर्भवती होण्यासाठी प्रोत्साहन देऊ इच्छित नाही. पण, लहान वयात गरोदर राहिल्याचा तिला कोणताही पश्चाताप नाही. सध्या ती फक्त तिच्या मुलाची काळजी घेण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. शाळेमध्ये बॉयफ्रेंडसोबत ओळख झाली होती. जवळपास चार महिन्यांच्या डेटिंगनंतर गरोदर राहिली. सुरुवातीला, जेव्हा तिला प्रेग्नेंसीबद्दल माहिती मिळाली तेव्हा ती स्वतः खूप निराश झाली होती.

सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर डेस्टिनी खूप लोकप्रिय आहे. यूट्यूबवर तिचे दोन लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. त्याचवेळी इन्स्टाग्रामवर जवळपास 20 हजार लोक फॉलो करतात. डेस्टिनीचा मुलगा Sincere'Cordae देखील एक सोशल मीडिया स्टार आहे, त्याचे इन्स्टाग्रामवर 11,500 फॉलोअर्स आहेत. डेस्टिनीने सांगितले- वयाच्या 14 व्या वर्षी गरोदर राहिल्यावर नोकरी मिळू शकली नाही, याच कारणामुळे उदरनिर्वाहासाठी यूट्यूब चॅनल सुरू केले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: pregnant in 14 years become mother at 15 years girl mother congratulated viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.