Power Of Music: गिटारच्या आवाजाने कोल्ह्याला केले मंत्रमुग्ध, 1 कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 14:46 IST2022-02-17T14:46:30+5:302022-02-17T14:46:38+5:30
एक व्यक्ती गिटार वाजवतो, तेवढ्यात एक जंगली कोल्हा तिथे येऊन बसतो.

Power Of Music: गिटारच्या आवाजाने कोल्ह्याला केले मंत्रमुग्ध, 1 कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला व्हिडिओ
मंत्रमुग्ध करणारे चांगले संगीत ऐकताच माणसांबरोबरच प्राणीही आकर्षित होतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक माणूस संगीताच्या जादूने जंगली कोल्ह्याला मंत्रमुग्ध करताना दिसत आहे. व्हिडिओ अमेरिकेतील असून, एक व्यक्ती कोल्ह्याला गिटारच्या तालावर वेड लावताना दिसत आहे.
कोल्हा संगीत ऐकून मंत्रमुग्ध होतो
व्हिडिओमध्ये एक माणूस गिटार वाजवताना दिसत आहे, तेवढ्यात एक कोल्हा जंगलातून बाहेर येतो आणि त्याच्याजवळ बसतो. कोल्हा त्या व्यक्तीच्या शेजारी बसून गिटारचा आनंद घेत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. अँडी थॉर्न नावाचा माणूस कोलोरॅडोच्या हिल्समध्ये गिटार वाजवताना दिसतो. गिटारची धून ऐकून कोल्हा तिथे येतो आणि मंत्रमुग्ध होऊन बसलेला दिसतो.
55 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये अँडी सूर्यास्ताच्या वेळी टेकड्यांवर गिटार वाजवताना दिसत आहे. तेवढ्यात एक कोल्हा त्या गिटारचा आवाज ऐकताच तिथे येतो आणि काही वेळ तिथे बसून गिटारची धून ऐकून मंत्रमुग्ध होतो. थोड्यावेळानंतर तो कोल्हा तिथून उठून निघून जाते.
व्हिडिओला 1 कोटींहून अधिक व्ह्यू
गुडन्यूजडॉग नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 1 कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओ शेअर करताना यूजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'संगीताची शक्ती!' व्हिडिओ पाहून एका यूजरने 'चांगले संगीत हे एका शक्तिशाली चुंबकासारखे असते', अशी प्रतिक्रिया दिली.