इथे जनावरांप्रमाणे पिंजऱ्यात राहतात लोक, कारण वाचून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 05:09 PM2019-04-22T17:09:44+5:302019-04-22T17:20:40+5:30

तुम्ही अनेक जनावरांना पिंजऱ्यात राहतात पाहिलं असेल. पण कधी माणसांना पिंजऱ्यात राहताना पाहिलं का? नाही ना?

Poor people in hongkong lives in metal cage | इथे जनावरांप्रमाणे पिंजऱ्यात राहतात लोक, कारण वाचून व्हाल थक्क!

इथे जनावरांप्रमाणे पिंजऱ्यात राहतात लोक, कारण वाचून व्हाल थक्क!

(Image Credit : CBC.ca)

तुम्ही अनेक जनावरांना पिंजऱ्यात राहतात पाहिलं असेल. पण कधी माणसांना पिंजऱ्यात राहताना पाहिलं का? नाही ना? पण जगाच्या पाठीवर एक असंही ठिकाण आहे जिथे लोक लोखंडी पिंजऱ्यात राहतात. आता प्रश्न तुम्हाला प्रश्न पडला असेल की, असं का? का लोक लोखंडी पिंजऱ्यात जनावरांप्रमाणे राहतात? चला जाणून घेऊ याचं कारण.

(Image Credit : NBC News)

हॉंगकॉंगमधील गरीब हे लोक लोखंडी पिंजऱ्यात राहतात. पण हे पिंजरे सुद्धा त्यांना सहजपणे मिळत नाहीत. यासाठीही त्यांना किंमत चुकवावी लागते. असे सांगितले जाते की, एका पिंजऱ्याची किंमत जवळपास ११ हजार रुपये आहे. हे पिंजरे पडक्या घरांमध्ये ठेवले जातात. 

(Image Credit : Social Media)

पिंजऱ्यांमध्ये एका अपार्टमेंटमध्ये १००-१०० लोकं राहतात. एक अपार्टमेंटमध्ये केवळ दोनच टॉयलेट असतात. ज्यामुळे लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या पिंजऱ्यांची साइज ठरलेली असते. यातील एखादा पिंजरा छोट्या कॅबिनसारखा असतो तर एखादा पिंजरा एका मोठ्या पेटीच्या आकाराचा असतो. या पिंजऱ्यात गादीऐवजी लोक बांबूच्या चटईचा वापर करतात. 

(Image Credit : Social Media)

सोसायटी फॉर कम्युनिटी ऑर्गनायझेशननुसार, हॉंगकॉंगमध्ये सध्या याप्रकारच्या घरांमध्ये जवळपास १ लाख लोक राहतात. हे लोक महागडे घर खरेदी करण्यासाठी सक्षम नसणारे लोक आहेत. त्यामुळेच या लोकांवप जनावरांप्रमाणे लोखंडी पिंजऱ्यात राहण्याची वेळ आली आहे. 

Web Title: Poor people in hongkong lives in metal cage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.