ऐतिहासिक! तीन पुरूषांनी मिळून २ बाळांना दिला जन्म, कायदेशीर लढाईसाठी आला ८८ लाख रूपये खर्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 15:12 IST2021-03-08T15:09:01+5:302021-03-08T15:12:30+5:30
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या या तिघांची नावे इआन जेनकिंस, एलन मेफील्ड आणि जेरेमी एलेन हॉजेज अशी आहेत. इआन हा डॉक्टर आहे.

ऐतिहासिक! तीन पुरूषांनी मिळून २ बाळांना दिला जन्म, कायदेशीर लढाईसाठी आला ८८ लाख रूपये खर्च
अमेरिकेतील तीन गे पुरूषांनी 'तीन पिता असलेला पहिला परिवार' रूपात इतिहासात नाव नोंदवलं आहे. यासाठी तिघांनाही मोठी कायदेशीर लढाई लढावी लागली. तीन गे पुरूषांना दोन सरोगेट माता आणि एक एग डोनरच्या मदतीने एका मुलाला आणि एका मुलीला जन्म दिला.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या या तिघांची नावे इआन जेनकिंस, एलन मेफील्ड आणि जेरेमी एलेन हॉजेज अशी आहेत. इआन हा डॉक्टर आहे. इआनने एक पुस्तक लिहिलं आहे ज्यात बाळाला जन्म देणे आणि बर्थ सर्टिफिकेटमध्ये तीन वडिलांची नावे टाकण्यासाठी केलेल्या संघर्षाबाबत विस्ताराने लिहिले आहे. यांना पहिल्या बाळाला जन्म देण्यासाठी मेडिकल प्रक्रिया आणि बर्थ सर्टिफिकेट मिळवण्यासाठी कायदेशीर लढाईवर साधारण ८८ लाख रूपये खर्च करावे लागले.
बाळांना जन्म देण्यासाठी तिन्ही वडिलांना मेडिकल प्रक्रियांसाठी खूप खर्च करावा लागला. त्यानंतर नाव देण्यासाठी कायदेशीर लढाई करावी लागली. अखेर तिघांनाही कोर्टात मोठा विजय मिळाला. अमेरिकेतील एका न्यायाधीशांनी निर्णय देत सांगितले की, ते त्यांच्या बाळांच्या बर्थ सर्टिफिकेटवर वडिलांच्या रूपात तिन्ही पुरूषांची नावे लिहू शकतात.
इआन आणि एलन साधारण १७ वर्षांचे होते. तर तिसरा पार्टनर त्यांच्यासोबत ८ वर्षांपासून आहे. न्यूयॉर्क पोस्टसोबत बोलताना इआन म्हणाला की, पाइपर(मुलीचं नाव) चे तीन पॅरेट्स आहेत आणि ही काही मोठी बाब नाही. तो म्हणाला की, त्याचेही स्वत:चे तीन पॅरेंट्स होते. ते म्हणजे वडील, आई आणि सावत्र आई.
सीएनएनसोबत बोलताना इआन म्हणाला की, पॅरेंट्स आणि मुलांचे अधिकार सुनिश्चित करण्यासाठी बर्थ सर्टिफिकेटवर तीन वडिलांची नावे नोंदवणं गरजेचं होतं. तो म्हणाला की, ही प्रक्रिया भावनात्मक रूपाने थकवणारी होती. इआन म्हणाला की, त्यांच्या या अनुभवामुळे इतर लोकांना थोडा दिलासा मिळेल.