11 हजार फुटांवर विमान, पायटलच्या पाठीवर जगातील सर्वात विषारी साप; जरा जरी हलला असता...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 09:31 AM2023-04-07T09:31:19+5:302023-04-07T10:12:49+5:30

गेल्या पाच वर्षापासून पायलट म्हणून काम करत असलेल्या इरासम्सने पाहिलं की, कोब्रा त्याच्या सीटखाली बसला आहे तरीही तो घाबरला नाही. तो शांत राहिला.

Pilot saw cobra under his seat then made safe emergency landing | 11 हजार फुटांवर विमान, पायटलच्या पाठीवर जगातील सर्वात विषारी साप; जरा जरी हलला असता...

11 हजार फुटांवर विमान, पायटलच्या पाठीवर जगातील सर्वात विषारी साप; जरा जरी हलला असता...

googlenewsNext

Cape kobra under Pilot seat: तसं तर विमान उडवत असताना कोणत्याही वाईट स्थितीसोबत निपटण्यासाठी पायलट लोकांना प्रशिक्षण दिलं जातं. पण जर कॉकपीटमध्ये साप घुसला तर कुणालाही घाम फुटेल. मात्र, दक्षिण आफ्रीकचे पायलट (south african pilot) रूडोल्फ इरासम्सने ही स्थितीही चांगल्या प्रकारे हाताळली. झालं असं की, जेव्हा इरासम्सचं विमान हवेत होतं एका विषारी साप केप कोबरा (Cape Cobra) कॉकपीटमध्ये आला. पण त्याने न घाबरता विमानाचं इमरजन्सी लॅंडींग केलं. 

गेल्या पाच वर्षापासून पायलट म्हणून काम करत असलेल्या इरासम्सने पाहिलं की, कोब्रा त्याच्या सीटखाली बसला आहे तरीही तो घाबरला नाही. तो शांत राहिला. पायलट सोमवारी सकाळी एक छोटं विमान वॉर्सेस्टरहून नेल्सप्रुइटला नेत होता.

‘टाइम्स लाइव’ वेबसाइटला या घटनेबाबत सांगितलं. तो म्हणाला की, 'सोमवारी सकाळी जेव्हा आम्ही उड्डाणाची तयारी केली तेव्हा वॉर्सेस्टर विमान तळाच्या लोकांनी आम्हाला सांगितलं की, त्यांना रविवारी दुपारी विंगच्या खाली एक केप कोब्रा पडलेला दिसला होता. त्यांनी तो स्वत: पकडण्याचा प्रयत्न केला पण तो इंजिनजवळ लपला. चेक केलं तर साप तिथे दिसला नाही. त्यामुळे त्यांना वाटलं की, साप निघून गेला असेल'.

इरासम्स म्हणाला की, 'मी सामान्यपणे प्रवासावेळी पाण्याची बॉटल जवळ ठेवतो. मला थंड थंड जाणवलं तर वाटलं की, बॉटलमधील पाणी सांडत असेल. मी खाली पाहिलं तर सीटच्या खाली कोब्रा फणा डोलवत आहे'.

पायलट म्हणाला की, 'मी सुन्न झालो होतो. मी हाच विचार करत होतो की, मी प्रवाशांना याबाबत सांगू नये. कारण मला त्यांना घाबरवायचं नव्हतं. पण नंतर त्यांना सांगावं लागलंच असतं. अशात मी त्यांना केवळ इतकं सांगितलं की, काहीतरी समस्या आहे. विमानात साप आहे. मला वाटतं की, साप माझ्या सीट खाली आहे. अशात आपण लवकरात लवकर इमरजन्सी लॅंडींग करण्याचा प्रयत्न करू'.

तो पुढे म्हणाला की, विमान साधारण 11 हजार फूट उंचीवर उडत होतं. आमचं विमान वेल्कमच्या विमानतळाच्या जवळ होतं. त्यामुळे मी जोहान्सबर्गमध्ये कंट्रोल टॉवरला इमरजन्सी असल्याचं सांगितलं.

पायलट म्हणाला, आम्ही विमान लॅंड केल्यावर प्रवासी बाहेर आले. मी सगळ्यात शेवटी बाहेर आलो. जशी मी सीट पुढे सरकवली साप तिथे बसला होता. आम्ही सापाला पकडण्यासाठी आजूबाजूच्या लोकांना संपर्क केला. ते येईपर्यंत साप पुन्हा गायब झाला.

इंजिनिअर लोकांना सापाला शोधण्यासाठी विमानाचे काही पार्टस वेगळे केले. पण रात्र होईपर्यंत त्यांना साप दिसला नाही. त्यांनी सकाळी सुद्धा सापाचा शोध घेणं सुरू ठेवलं. इरासम्स म्हणाला की, त्याला वाटतं की, जेव्हा ते इंजिनिअरांची वाट बघत होते कदाचित तेव्हाच साप निघून गेला असेल.
 

Web Title: Pilot saw cobra under his seat then made safe emergency landing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.