किडनी फेल झाल्याने मृत्यूच्या दारात होती महिला, डॉक्टरही हरले; पाळीव श्वानाने वाचवला तिचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 16:02 IST2023-04-26T16:00:56+5:302023-04-26T16:02:33+5:30
या घटनेतही श्वानाने मृत्यूच्या दारात असलेल्या आपल्या मालकीनीचा जीव वाचवला आहे. या श्वानाने 2 कोटी लोकांपैकी एका अशा व्यक्तीला शोधलं ज्याच्यामुळे त्याच्या मालकीनीचा जीव वाचला.

किडनी फेल झाल्याने मृत्यूच्या दारात होती महिला, डॉक्टरही हरले; पाळीव श्वानाने वाचवला तिचा जीव
श्वान हा सगळ्यात प्रमाणिक प्राणी मानला जातो. श्वान जेव्हा एकदा आपल्या मालकांना जीव लावतात तेव्हा ते आपल्या जीवाची पर्वा न करता मालकाला वाचवतात याची अनेक उदाहरणे बघायला मिळाली आहेत. श्वानांच्या अनेक हैराण करणाऱ्या घटना आपण ऐकत असतो. अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेतही श्वानाने मृत्यूच्या दारात असलेल्या आपल्या मालकीनीचा जीव वाचवला आहे. या श्वानाने 2 कोटी लोकांपैकी एका अशा व्यक्तीला शोधलं ज्याच्यामुळे त्याच्या मालकीनीचा जीव वाचला.
हैराण करणारी ही घटना साउथ वेल्समधील आहे. येथील लूसी हेम्फ्रे नावाची एका महिला तिच्यासाठी एका किडनी डोनरचा शोध घेत होती. तिची किडनी खराब झाली होती आणि ती एखाद्या मॅच होणाऱ्या डोनरची वाट बघत होती. पण तिला कुणीही डोनर मिळाला नाही. जे मिळाले ते मॅच झाले नाही.
दरम्यान त्याच्या पाळीव श्वानाने तिच्यासाठी नकळतपणे किडनी डोनर शोधून काढली आणि मालकीनीचा जीव वाचवण्यात महत्वाची भूमिका बजावली. झालं असं की, लूसी आपल्या पती आणि श्वानासोबत साऊथ वेल्सच्या एक बीचवर टाइम स्पेंड करण्यासाठी गेली होती. यादरम्यान श्वान तिथे असलेल्या एका महिलेजवळ गेला. ती महिला जेव्हा तिथून जाऊ लागली होती तेव्हा तो तिला रोखत होता.
अशात अनोळखी महिलेसोबत श्वानाचं असं वागणं पाहून लूसी त्यांच्याजवळ गेली आणि लूसीने महिलेची माफीही मागितली. अशात त्यांच्यात संवाद सुरू झाला. दुसऱ्या महिलेचं नाव कॅटी जेम्स आहे. लूस आणि कॅटीमध्ये ओळख झाली. बोलता बोलता लूसीने कॅटीला सांगितलं की, ती एका किडनी डोनरच्या शोधात आहे. तिच्याकडे केवळ काही वर्षच शिल्लक आहेत.
अशात कॅटी लूसीला म्हणाली की, तिला तिची किडनी डोनेट करायची आहे आणि यासाठी तिने काही दिवसांआधी नोंदणीही केली आहे. कॅटी लूसीला किडनी देण्यास तयार झाली. कॅटीच्या टेस्ट करण्यात आल्या आणि तिची किडनी मॅच झाली. डॉक्टर म्हणाले की, या महिलेची किडनी तशीच आहे जशी लूसीला हवी आहे. ते म्हणाले की, अशाप्रकारे मॅच 2.2 कोटी लोकांपैकी एकामध्ये होतं. त्यानंतर किडनी यशस्वीपणे ट्रान्सप्लांट करण्यात आली आणि लूसीचा जीव वाचला.