बोंबला! कोर्टाच्या ऑनलाइन सुनावणीदरम्यान वकील 'कामक्रिडा' करण्यात मग्न, सगळेच हैराण....
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 13:57 IST2021-02-02T13:31:48+5:302021-02-02T13:57:34+5:30
ही घटना पेरूतील राज्य जुनिनच्या पिचानकी शहरातील आहे. इथे ऑर्गनाइज्ड क्राइम विरोधातील एका प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश जॉन चाहुआ टोरेस यांच्या कोर्टात सुरू होती.

बोंबला! कोर्टाच्या ऑनलाइन सुनावणीदरम्यान वकील 'कामक्रिडा' करण्यात मग्न, सगळेच हैराण....
पेरूच्या एका वकिलाच्या बेजबाबदारपणामुळे त्याचं सार्वजनिक जीवन आणि त्याचं करिअर अडचणीत आलं आहे. वकील एका केसच्या सुनावणी दरम्यान वेबकॅमवर 'कामक्रिडा' करण्यात बिझी असल्याचे दिसले. ज्यानंतर प्रकरणाची सुनावणी करत असलेले जजही हा प्रकार पाहून हैराण झाले. यानंतर न्यायाधीशांनी वकिलाला केसवरून काढलं आणि सोबतच त्याच्यावर दोन केस दाखल करण्याचा आदेश दिला.
व्हर्चुअल सुनावणीदरम्यान 'कांड'?
ही घटना पेरूतील राज्य जुनिनच्या पिचानकी शहरातील आहे. इथे ऑर्गनाइज्ड क्राइम विरोधातील एका प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश जॉन चाहुआ टोरेस यांच्या कोर्टात सुरू होती. यात बचाव पक्षाकडून हेक्टर रॉब्लेस हे आपली बाजू मांडणार होते. मात्र वेळेआधीच त्यांच्या कॉम्प्युटरचा कॅमेरा ऑन होता. यादरम्यान ते एका महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवण्यात बिझी होते. त्यांना त्यांचा कॅमेरा सुरू असल्याचं समजलंच नाही. अशातच केसची सुनावणी सुरू झाली होती.
सर्वांनाच बसला धक्का
ज्यावेळी हेक्टर रॉब्लेस शारीरिक संबंध ठेवण्यात बिझी तेव्हा त्यांचं लाइव्ह फीड सुरू होतं. अनेक लोक हे रेकॉर्डींगही करत होते. मानले जात आहे की, त्यावेळी वकील हेक्टरसोबत त्यांची क्लाएंट विचित्र स्थितीत होती. न्यायाधीशांसोबत सगळे लोक हा सगळा प्रकार बघत होते. यानंतर न्यायाधीशांनी लगेच पोलिसांना सांगून ते लाइव्ह फीड बंद केलं आणि सांगितले की, प्रकरणाची चौकशी करा.
न्यायाधीश म्हणाले - हा कोर्टाचा अपमान
ही घटना न्यायाधीश जॉन चाहुआ टोरेस यांनी कोर्टाचा अपमान मानलं आणि त्यांच्या विरोधात कोर्टात केस दाखल करण्याचे आदेश दिले. आता कोर्टात वकिलाविरोधात केस चालवली जाणार आहे. यादरम्यान न्यायाधीशांनी केसची सुनावणी रोखली असून हेक्टर रॉब्लेसला केसवरून हटवण्याचे आदेश दिले आहे.