Naked village: या गावात कपडे घालण्यावर बंदी, नग्नावस्थेतच राहतात लोक; जगतात 5 स्टार जीवन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 18:12 IST2023-01-07T18:07:22+5:302023-01-07T18:12:24+5:30
ब्रिटेनमध्ये स्पीलप्लॅट्झ नावाचे एक गाव आहे. येथील लोकांनी जवळपास 94 वर्षांपासून कपडे न घालता रहायचे ठरवले आहे. हे गाव हर्टफोर्डशायरच्या ब्रिकेटवुड जवळ आहे.

Naked village: या गावात कपडे घालण्यावर बंदी, नग्नावस्थेतच राहतात लोक; जगतात 5 स्टार जीवन!
अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मानवाच्या मुख्य आणि मुलभूत गरजा आहेत. यांपैकी कोणतीही एक गोष्ट वगळली तरी समाज जीवनाची कल्पना करणे काहीसे अवघडच. कोणत्याही देशातील पोशाखाचा संबंध थेट तेथील संस्कृतीशी येत असतो. संपूर्ण जगात मानव हा एकमेव असा प्राणी आहे, जो कपडे परिधान करतो. मात्र असे असले तरी, जगात असेही काही समूह आहेत, जे कपडे परिधान करत नाहीत. काही आदिवासी समाजही असे आहेत जे कपडे घालत नाहीत. पण ते सहसा स्वतःला मुख्य प्रवाहापासून दूर ठेवताना दिसतात. मात्र आम्ही येथे ज्या समाजासंदर्भात बोलत आहोत, तो समाज अत्यंत सुशिक्षित आहे आणि ज्या गावाचासंदर्भात बोलत आहोत, ते गावही फार अधिक प्रमाणावर प्रगत आहे.
या गावात कपडे न घालताच राहतात लोक -
ब्रिटेनमध्ये स्पीलप्लॅट्झ नावाचे एक गाव आहे. येथील लोकांनी जवळपास 94 वर्षांपासून कपडे न घालता रहायचे ठरवले आहे. हे गाव हर्टफोर्डशायरच्या ब्रिकेटवुड जवळ आहे. येथे महिला असो अथवा पुरुष सर्वांना निर्वस्त्रच रहावे लागते. महत्वाचे म्हणजे, येथे फिरायला येणाऱ्या लोकांनाही याच पद्धतीने रहावे लागते. स्पीलप्लाट्झमधील लोकांची लाईफस्टाईल अत्यंत प्रगत आहे.
या गावात पब, स्विमिंग पूल आणि इतरही अनेक सुविधा -
या गावात स्वतःचे पब, स्विमिंग पूल आणि इतरही अनेक सुविधा आहेत. यावरून आपल्याला येथील लोकांच्या राहणीमानाची कल्पाना येईल. हे गाव वसवण्याचे श्रेय इसुल्ट रिचर्डसन यांना दिले जाते. रिचर्डसन यांनी 1929 मध्ये हे गाव वसवले. थंडीच्या दिवसांत येथे कपडे परिधान करायची सूट असते.
...म्हणून येथील लोक नग्नावस्थेत राहतात -
हे गाव वसवणाऱ्या इसुल्ट रिचर्डस यांची शहरातील गोंगाटापासून दूर जाण्याची इच्छा होती. कारण त्यांना निसर्गाच्या सानिध्यात जीवन जगायचे होते. अशा प्रकारच्या जीवनशैलीमुळे येथील लोक स्वतःला निसर्गाच्या जवळ असल्यासारखे मानतात. खरे तर, हे गाव वसवतांना मोठा विरोधही झाला होता. मात्र, जगण्याच्या अधिकारापुढे सर्व विरोध विरून गेला. याशिवाय भारतातील अंदमानमधील एका बेटावर राहणारा 'जारवा' आदिवासी समाजही आपले जीवन बिना कपड्याचेच व्यतीत करतो.