संत्र्याची वाळलेली साल विकून कोट्याधीश बनत आहेत लोक, एका किलोची किंमत वाचून येईल चक्कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 14:56 IST2025-12-12T14:55:23+5:302025-12-12T14:56:15+5:30
Orange Peel Growing Business : संत्र्याच्या सुकवलेल्या सालींना ‘चेनपी’ म्हणतात आणि या चेनपीचा असा जोरदार व्यापार चालतो की लोक केवळ साली विकून श्रीमंत होत आहेत.

संत्र्याची वाळलेली साल विकून कोट्याधीश बनत आहेत लोक, एका किलोची किंमत वाचून येईल चक्कर
Orange Peel Growing Business : जगभरात संत्रींचा मोठा व्यवसाय होतो. चीनच्या रस्त्यांवर संत्री विक्रीला दिसतात हे काही नवीन नाही. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, या संत्र्याच्या सालीदेखील कोट्यवधींचा व्यवसाय बनू शकतात? ग्वांगडोंग प्रांतातील झिन्हुई भागात संत्र्याच्या सुकवलेल्या सालींना ‘चेनपी’ म्हणतात आणि या चेनपीचा असा जोरदार व्यापार चालतो की लोक केवळ साली विकून श्रीमंत होत आहेत.
आपल्याला विश्वास बसणार नाही, पण १० वर्षे जुनी साल १२,००० रुपये किलो, तर ५०–६० वर्षे जुनी साल लाखोंमध्ये विकली जाते. मार्केटमध्ये इतकी मोठी मागणी की लिस्ट होताच स्टॉक संपतो. हा काही नवा ट्रेंड नाही, तर शेकडो वर्षांची परंपरा आज 'इन्व्हेस्टमेंट मॉडेल' बनली आहे.
चेनपी म्हणजे नेमके काय?
चेनपी म्हणजे संत्रे किंवा मँडरीन ऑरेंजच्या साली धूपात पूर्णपणे सुकवून वर्षानुवर्षे एज केलेल्या साली. हिरवी, कच्ची संत्री तोडून त्यांच्या साली काढल्या जातात. ३ दिवसांपासून ते अनेक वर्षांपर्यंत सुकवल्या जातात. जितकी साल जुनी, तितकी तिची चव अधिक गोड-कडू, सुगंधित आणि उपचारासाठी फायदेशीर होते.
चेनपीचे आरोग्याला होणारे फायदे
- पचन सुधारते
- खोकला कमी करते
- फुफ्फुस स्वच्छ करते
- सर्दी-पडस्यात अतिशय प्रभावी मानली जाते
यात नॉबिलेटिन आणि हेस्पेरिडिन सारखे घटक असतात जे इम्युनिटी वाढवतात. स्वयंपाकातही चेनपी वापरतात. चेनपी बीफ, ऑरेंज चिकन, हर्बल चहा आणि मसाल्यांतही याचा उपयोग होतो. पण आज त्याची खरी किंमत औषध आणि गुंतवणूक यासाठी आहे.
एवढी मागणी का?
झिन्हुईला 'चेनपी कॅपिटल' म्हणतात. येथे हजारो एकरांचे संत्र्याचे बाग आहेत. हिवाळ्यात शेतकरी साली सुकवून त्या एजिंगसाठी स्टोअर करतात.
किंमती इतक्या? कारण…
१–३ वर्षांची साल : ६००–१००० रुपये किलो
१० वर्षांची साल : १२,००० रुपये किलो
३० वर्षांची साल : १ लाख रुपये किलो
५०+ वर्षांची साल : ८ लाख रुपये किलो!
२०२३ मध्ये हॉंगकॉंगच्या लिलावात १९६८ च्या चेनपीची किंमत ८ लाख रुपयांवर पोहोचली होती.
चीनमध्ये अनेक गृहिणी घरीच साली सुकवून ५–१० वर्षांनी विकतात आणि चांगला नफा कमावतात. एका फ्रूट व्हेंडरने सांगितले की गेल्या ५ वर्षांत सालींच्या किंमती ६ पट वाढल्या आहेत. सप्लाय कमी आणि मागणी प्रचंड म्हणून ई-कॉमर्सवर लिस्ट होताच स्टॉक संपतो. आता हळूहळू भारतातही चेनपीचा बाजार वाढत आहे.