शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

साधा रिक्षावाला पण आता झाला एका रात्रीत जागतिक स्तरावर प्रसिद्ध, काय केलं त्याने? एकदा वाचाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 19:11 IST

वाचाल तर वाचाल असं म्हणतात. पण वाचाल तर जगप्रसिद्ध व्हाल अशी नवी म्हण आता रुढ होण्याची शक्यता आहे. केरळ मधला एक रिक्षावाला याच कारणामुळे रातोरात आंतराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालाय. काय केलंय त्याने असं वाचा पुढे...

वाचाल तर वाचाल असं म्हणतात. पण वाचाल तर जगप्रसिद्ध व्हाल अशी नवी म्हण आता रुढ होण्याची शक्यता आहे. केरळ मधला एक रिक्षावाला याच कारणामुळे रातोरात आंतराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालाय. काय केलंय त्याने असं वाचा पुढे...

केरळमधील एका ऑटोवर Paulo Coelho असे लिहून खाली मल्याळममध्ये लिहिले आहे की, ‘अल्केमिस्ट’ आता या ऑटोचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या पुस्तकाचे लेखक लेखक Paulo Coelho यांनी स्वत: हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “केरळ, भारत (फोटोसाठी खूप खूप धन्यवाद).” Paulo Coelho हे सर्वात प्रसिद्ध लेखकांपैकी एक आहेत, त्यांची पुस्तके जगभरात प्रचंड वाचली जातात.

फोटोमध्ये दिसणाऱ्या ऑटोच्या नंबर प्लेटवरून दिसून येते की हा ऑटो एर्नाकुलमच्या आऱटीओ प्राधिकरणाकडे नोंदणीकृत आहे. ऑटोरिक्षा मालक केए प्रदीप ट्विटरवर नाहीत. पण जेव्हा त्यांच्या मित्रांनी त्याला त्याच्या ऑटो ट्वीटबद्दल सांगितले, तेव्हा त्यांना अत्यंत आनंद झाला. सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही पोस्ट पाहून अनेकांनी प्रदीपची स्तुती करायला सुरुवात केली. एका मीडिया रिपोर्टनुसार, प्रदीपला पुस्तके वाचण्याची आवड आहे. या छंदामुळे ५५ वर्षीय प्रदीपने Paulo Coelho या जगप्रसिद्ध लेखकाची १० पुस्तके वाचली आहेत. प्रदीप २५ वर्षांपासून ऑटोरिक्षा चालवत आहेत.

जेव्हा प्रदिप यांच्या ऑटोचा फोटो व्हायरल झाला, तेव्हा प्रदीप हे खूप आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले की, “माझ्यासाठी हा खुप मोठा आश्चर्याचा धक्का होता. माझ्या आवडत्या लेखकाने माझ्या ऑटोरिक्षाबद्दल ट्विट केले हे जाणून मला खूप आनंद झाला आहे. ”तसेच, प्रदीप यांनी Paulo Coelho यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली!

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरauto rickshawऑटो रिक्षा