बिझनेसमॅन लपून करत होता दुसरं लग्न, अचानक पहिल्या पत्नीने येऊन मंडपात घातला गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 15:23 IST2021-07-07T15:21:52+5:302021-07-07T15:23:19+5:30

नम्रताने सगळ्यांसमोर जेव्हा पतीची पोलखोल केली तर तो गप्प बसल आणि पत्नीने सर्व पाहुण्यांसमोर पती आणि त्याच्या परिवाराला सुनावले.

Patna businessman secretly planning second marriage wife who reached pavilion created ruckus | बिझनेसमॅन लपून करत होता दुसरं लग्न, अचानक पहिल्या पत्नीने येऊन मंडपात घातला गोंधळ

बिझनेसमॅन लपून करत होता दुसरं लग्न, अचानक पहिल्या पत्नीने येऊन मंडपात घातला गोंधळ

बिहारची राजधानी पटणा येथील एका मोठ्या व्यावसायिकाच्या लग्नात अचानक गोंधळ झाला. आरोप आहे की, पतीने आपल्या पहिल्या पत्नीला फसवून घटस्फोट दिला आणि ८ वर्षीय मुलीला सोडून त्याने दुसऱ्या महिलेसोबत लग्न करत होता. दुसरं लग्न करत असलेल्या पतीच्या मंडपात अचानक पहिली पत्नी नम्रता पोहोचली आणि तिने पतीला रंगेहाथ पकडलं.

नम्रताने सगळ्यांसमोर जेव्हा पतीची पोलखोल केली तर तो गप्प बसल आणि पत्नीने सर्व पाहुण्यांसमोर पती आणि त्याच्या परिवाराला सुनावले. ही घटना पटण्यातील एक प्रख्यात परिवारात घडली आहे. (हे पण वाचा : गर्लफ्रेन्डच्या वडिलांनी रंगेहाथ पकडलं, तरूणाने विना कपडे १३व्या मजल्यावरून मारली उडी आणि...)

पटण्यातील ज्ञान गंगा पब्लिकेशनचे मालक सिद्धार्थवर आरोप आहे की, त्याने फसवून पत्नीला एक्सपार्टी जजमेंट करून घटस्फोट दिला आणि तो दुसरं लग्न करण्यासाठी मंडपात बसला होता. इतक्यात तिथे त्याची पहिली पत्नी पोहोचली आणि सर्वांसमोर तिने त्याचा भांडाफोड केला. त्यामुळे लग्न मंडपात एकच गोंधळ उडाला. 

हे लग्न एका हॉटेलमध्ये सुरू होतं. नम्रता सिंहसोबत जाप पार्टीचे नेतेही होते. जाप पार्टीचे नेते म्हणाले की, ते पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आले आहेत.

नम्रता सिंहने मीडियाला सांगितलं की, तिचा पती सिद्धार्त सिंहने तिला फसवून तिच्याकडून घटस्फोट घेतला. तिला अंधारात ठेवून त्याने घटस्फोटाच्या कागदांवर सही करून घेतली. दुसरं लग्न हे लपून केलं जात होतं. कुणाकडून तरी तिला या लग्नाची माहिती मिळील आणि ती तिथे पोहोचली.
 

Web Title: Patna businessman secretly planning second marriage wife who reached pavilion created ruckus