बाबो! 'या' पार्कमध्ये जाण्यासाठी काढावे लागतात अंगावरील सगळे कपडे, न्यूड होऊन फिरतात लोक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 15:09 IST2022-02-21T15:07:47+5:302022-02-21T15:09:09+5:30
Paris : आज आम्ही तुम्हाला एका अशा पार्कबाबत सांगत आहोत जिथे एन्ट्री घेण्यासाठी तुम्हाला कपडे काढावे लागतात. कोणतेही महिला- पुरूष इथे कपडे घालून जाऊ शकत नाहीत.

बाबो! 'या' पार्कमध्ये जाण्यासाठी काढावे लागतात अंगावरील सगळे कपडे, न्यूड होऊन फिरतात लोक
आजकाल लोक फिटनेससाठी सकाळी आणि सायंकाळी पार्कमध्ये फिरायला जातात. अलिकडे तर बऱ्याच हाउसिंग सोसायटीमध्ये पार्कची सुविधा असते. महिला-पुरूष तिकडे वॉक करतात. तर लहान मुलं खेळतात. पार्कमध्ये जाण्यासाठी लोक स्पोर्ट्स ट्रॅक सूट घालतात. पण असाही काही नियम नसतो. तुम्ही कोणतेही कपडे घालून पार्कमध्ये जाऊ शकता. मात्र, आज आम्ही तुम्हाला एका अशा पार्कबाबत सांगत आहोत जिथे एन्ट्री घेण्यासाठी तुम्हाला कपडे काढावे लागतात. कोणतेही महिला- पुरूष इथे कपडे घालून जाऊ शकत नाहीत.
पार्कमध्ये न्यूड होऊन फिरतात लोक
सीएनएनच्या एका रिपोर्टनुसार, या पार्कमध्ये तुम्ही न्यूड होऊन फिरू शकता. हा पार्क फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये (Paris) आहे. पॅरिसमधील पब्लिक पार्क 'बोइस दे विंसेन्स' मधील एक भाग न्यू क्षेत्रासाठी ठेवला आहे. हा पार्क खासकरून न्यूड राहणाऱ्या लोकांसाठी बनवण्यात आला आहे. इथे लोक आपल्या मनानुसार फिरतात आणि न्यूड होऊन फिरतात. याने त्यांना स्वतंत्र वाटतं आणि यासाठी त्यांना कोणत्याही बीचवर जाण्याची गरज नाही.
पार्कमध्ये सुरक्षा व्यवस्था
या पार्कची सर्वात खास बाब म्हणजे इथे सुरक्षेची खास व्यवस्था करण्यात आली आहे. इथे कुणीची चुकीची काही करू शकत नाही. असं झालं तर कठोर कारवाई केली जाते. या पार्कबाबत अधिकारी म्हणाले की, हा पार्क न्यूडिस्ट जोन पार्कजवळ आहे आणि याचा आकार एका फुटबॉल ग्राउंड इतका आहे.
इथे न्यूड होऊन फिरणाऱ्या लोकांना कुणीची त्रास देत नाही. सुरूवातीला हा पार्क प्रयोग म्हणून सुरू करण्यात आला होता. पण याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा पार्क पुढे सुरू ठेवला गेला. या पार्कमध्ये येण्यासाठी एक ठराविक वेळही ठरवण्यात आली आहे.