ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 14:36 IST2025-09-13T14:33:43+5:302025-09-13T14:36:00+5:30

दुसरी नर्स काहीतरी सामान घेण्यासाठी त्या रूममध्ये गेली आणि तिने जे पाहिलं ते थक्क करणारं होतं.

Pakistani doctor disappears after leaving surgery midway! Nurse opens door to another room, sees shocking scene | ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार

ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार

तुम्ही कधी ऐकलंय का, ऑपरेशन सुरू असताना डॉक्टर चक्क 'लव्ह ब्रेक'वर जातात? ब्रिटनच्या टेमसाइड जनरल हॉस्पिटलमध्ये अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाकिस्तानी वंशाचे ॲनेस्थेटिस्ट, डॉ. सुहैल अंजुम, यांनी एका रुग्णाच्या शस्त्रक्रियेदरम्यान थिएटर सोडून जवळच्याच दुसऱ्या ऑपरेशन रूममध्ये एका नर्ससोबत आक्षेपार्ह अवस्थेत असताना पकडलं गेलं.

ही घटना सप्टेंबर २०२३ची आहे, पण नुकत्याच मँचेस्टर मेडिकल ट्रिब्यूनलमध्ये झालेल्या सुनावणीत या घटनेचा तपशील समोर आला. डॉ. अंजुम हे त्या दिवशी तिसऱ्या शस्त्रक्रियेत सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांकडून 'कम्फर्ट ब्रेक'साठी परवानगी घेतली आणि रुग्णाला एका नर्सच्या देखरेखीखाली सोडून ते दुसऱ्या रूममध्ये गेले.

इथेच ही गोष्ट घडली. एक दुसरी नर्स काहीतरी सामान घेण्यासाठी त्या रूममध्ये गेली आणि तिने जे पाहिलं ते थक्क करणारं होतं. डॉ. अंजुम आपली पॅन्ट सावरत होते आणि त्यांच्यासोबत असलेल्या नर्सचा स्कर्ट गुडघ्यापर्यंत खाली सरकलेला होता. तिने हे दृश्य पाहताच लगेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.

या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान डॉ. अंजुम यांनी आपला गुन्हा कबूल केला. त्यांनी ट्रिब्यूनलसमोर सांगितलं की, "माझ्या पत्नीने आमच्या लहान मुलाच्या अकाली जन्मानंतर खूप तणाव सहन केला होता, त्याच तणावातून माझ्याकडून ही चूक घडली."

या गंभीर प्रकरणानंतर डॉ. अंजुम यांनी २०२४ मध्ये नोकरीचा राजीनामा दिला आणि ते ब्रिटन सोडून पाकिस्तानला परत गेले आहेत. मात्र, त्यांच्या या कृत्यामुळे त्यांच्या वैद्यकीय परवान्यावर गदा येण्याची शक्यता आहे.

Web Title: Pakistani doctor disappears after leaving surgery midway! Nurse opens door to another room, sees shocking scene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.