बोंबला! ज्याला मृत समजून दफन केलं तो अचानक घरी परत आला आणि....
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 14:57 IST2020-03-11T14:49:18+5:302020-03-11T14:57:14+5:30
ज्या व्यक्तीला मृत्यूनंतर दफन करण्यात आलं होतं. पण अचानक दुसऱ्या दिवशी सकाळी तो घरी परत आला.

बोंबला! ज्याला मृत समजून दफन केलं तो अचानक घरी परत आला आणि....
पाकिस्तानातील सूबे पंजाबमधून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. येथील चीचा वतनी परिसरातील व्यक्तीला मृत्यूनंतर दफन करण्यात आलं होतं. पण अचानक दुसऱ्या दिवशी सकाळी तो घरी परत आला. 'एआरवाई न्यूज' ने दिलेल्या वृत्तानुसार, पंजाबच्या चीचा वतनी भागात एका व्यक्तीला मृत समजून दफन करण्यात आलं होतं.
मोहम्मद असलम नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं समजण्यात आलं. जेव्हा दुसऱ्या दिवशी तो व्यक्ती घरी परत आला तेव्हा त्याला पाहून सगळे लोक हैराण झाले. पण मुळात ज्या व्यक्तीला असलम समजून दफन करण्यात आलं होतं ती व्यक्ती दुसरीच कुणीतरी होती.
पोलिसांनी सांगितले की, मोहम्मद असलमल नशेची सवय आहे. त्यामुळे तो नेहमीच घरातून गायब असतो आणि अनेक दिवस घरी परत येत नाही. घरातील लोकांनी त्याची नशेची सवय सोडवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्याला घरातून बाहेर जाण्यापासून रोखण्याचाही प्रयत्न झाला. पण तो काही सुधरला नाही. आपल्या सवयीनुसार यावेळीही तो घरातून गायब झाला होता.
(Image Credit : popsci.com) (सांकेतिक छायाचित्र)
अशाच त्याच्या परिवाराला माहिती मिळाली की, एका मोहम्मद असलम नावाच्या व्यक्तीचा मृतदेह बस स्टॉपवर पडला आहे. त्यानंतर घरातील लोकांनी त्याचा चेहरा न पाहताच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी केली आणि त्याला असलम समजून दफन सुद्धा केले. पण दुसऱ्या दिवशी सकाळी तो घरी परतला. आता दफन केलेला माणूस घरी आला तर सर्वांना धक्का बसणारच. पण ज्या व्यक्तीला असलम समजून दफन करण्यात आलं, त्या व्यक्तीचं नाव मोहम्मद खालिद होतं.