गर्लफ्रेंड बनवत होती व्हिडीओ, तिच्या डोळ्यांसमोर झाला प्रियकराचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 15:12 IST2023-05-31T15:11:32+5:302023-05-31T15:12:40+5:30
Boyfriend died in front of Girlfriend: 26 वर्षीय स्कॉट सेडॉनसोबत ही दुर्घटना घडली. तो ग्रीस सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेला होता. त्याला पॅडबोर्डिंगची खूप आवड होती.

गर्लफ्रेंड बनवत होती व्हिडीओ, तिच्या डोळ्यांसमोर झाला प्रियकराचा मृत्यू
(Image Credit : Daily Star)
Boyfriend died in front of Girlfriend: असं म्हटलं जातं की, व्यक्तीचा जन्म आणि त्याचा मृत्यू दोन्हीही त्याच्या हातात नसतो. कुणासोबत कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. सेकंदात होत्याचं नव्हतं होतं. असंच काहीसं सुट्टी एन्जॉय करत असलेल्या एका तरूणासोबत झालं. तो समुद्रात मस्त सर्फिंग करत होता. अचानक त्याच्यावर वीज पडली आणि सगळं संपलं.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, 26 वर्षीय स्कॉट सेडॉनसोबत ही दुर्घटना घडली. तो ग्रीस सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेला होता. त्याला पॅडबोर्डिंगची खूप आवड होती आणि यासाठी ग्रीसमधील Rhodes हे ठिकाण त्याने निवडलं. पण स्कॉटला अजिबात याचा अंदाज नव्हता की, त्याच्यासोबत काय होणार आहे. त्याला हेही माहीत नव्हतं की, तो आयुष्यातील शेवटचं पॅडलबोर्डिंग करत आहे.
गर्लफ्रेंडच्या डोळ्यांसमोर गेला जीव
तसा तर स्कॉट ब्रिटनमध्ये राहतो त्याने ग्रीसमध्ये हॉलिडे हाउस बनवलं होतं. तो नेहमीच तिथे परिवारासोबत सुट्टी एन्जॉय करण्यात जात होता. 29 मे रोजी तो इथेच होता. दुपारी समुद्र किनारी पोहोचून पॅडलबोर्डिंग करत होता आणि त्याची गर्लफ्रेंड त्याचा व्हिडीओ काढत होती. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, लोकांनी सांगितलं की, वादळ येण्याचा अंदाज लागताच तिने खूपदा स्कॉटला बाहेर येण्यास सांगितलं होतं. अचानक दुपारी दीड वाजता स्कॉटवर वीज पडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
स्कॉटसोबत तिथे असलेल्या वॅंडर मचाडो यांनी सांगितलं की, जेव्हा ते स्कॉटजवळ पोहोचले तेव्हा त्याचा चेहरा निळा पडला होता. कसेतरी ते त्याला किनाऱ्यावर खेचत घेऊन आले. फर्स्टएड दिल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तेव्हा त्याला मृत घोषित केलं गेले. स्कॉटच्या परिवारानुसार, तो फारच दिलखुलास आणि मनमौजी माणूस होता. त्याच्या जाण्याने परिवाराला मोठा धक्का बसला आहे.