सुंदर मॉडलने नाकारली ६ कोटी रूपयांची ऑफर, अब्जाधीशाने केली होती विचित्र डिमांड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 16:29 IST2022-04-25T16:27:18+5:302022-04-25T16:29:39+5:30
कॅनडातील २४ वर्षीय मॉडलने सांगितलं की, तिला एका नॉन-डिस्क्लोजर अॅग्रीमेंटवर जबरदस्ती हस्ताक्षर करण्यास भाग पाडलं गेलं.

सुंदर मॉडलने नाकारली ६ कोटी रूपयांची ऑफर, अब्जाधीशाने केली होती विचित्र डिमांड
ओन्लीफॅन्स (OnlyFans) मॉडल एलिस इरविंगने एक धक्कादायक दावा केला आहे. मॉडलने सांगितलं की, एका प्रसिद्ध अब्जाधीशाने तिला त्याच्यासोबत कॅमेरासमोर संबंध ठेवण्यासाठी ७९०,००० डॉलर म्हणजे ६ कोटी रूपयांची ऑफर दिली होती. जी तिने नाकारली. कॅनडातील २४ वर्षीय मॉडलने सांगितलं की, तिला एका नॉन-डिस्क्लोजर अॅग्रीमेंटवर जबरदस्ती हस्ताक्षर करण्यास भाग पाडलं गेलं.
'द सन'च्या वृत्तानुसार, ज्या व्यक्तीने मॉडलला असं करण्याची ऑफर दिली, ती एक प्रसिद्ध व्यक्ती आहे. मॉडलने दावा केला की, 'ती व्यक्ती तिला भेटण्यासाठी आतुर झाली होती आणि तिला एकट्यात भेटण्याचा प्रयत्न करत होती. त्याला माझ्यासोबत संबंध ठेवायचे होते आणि ते कॅमेरात रेकॉर्डड करायचं होतं. पण मी ती ऑफर नाकारली. कारण मला तसं करायचं नव्हतं. मॉडलने ही ऑफर नाकारण्याचं कारणही सांगितलं.
मॉडलने सांगितलं की, ती केवळ पैशांसाठी असं काही करू शकत नाही. भलेही त्या व्यक्तीने कितीही मोठी ऑफर दिली तरी. मॉडलने सांगितलं की, ऑफर मिळाल्यावर तिने विचार केला की, अशाप्रकारच्या सेवांवर किंमत लावल्याने कलाकार म्हणून तिचं मूल्य कमी होईल आणि भविष्यात तिला काम मिळण्यास समस्या होईल. याच भीतीने तिने ही ऑफऱ नाकारली. एलिस इरविंग म्हणाली की, केवळ पैशांसाठी ती हे काम करू शकत नाही.
मॉडल म्हणाली की, भलेही या ऑफरमध्ये पैसे भरपूर होते. पण मी यावर बराच विचार केला. मला माझी क्षमता माहीत आहे आणि मला हेही माहीत आहे की, माझ्यासाठी इतका पैसा काहीच नाही. मॉडलने असाही दावा केला की, तिच्याकडे आध्यात्मिक शक्ती आहे. ती ज्या गोष्टींची भविष्यवाणी करते ते खरं ठरतं. १२ वर्षांची असताना तिने तिच्या वडिलांच्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती.