ना मुंबई ना दिल्ली...'हे' आहे देशात कुठेही जाण्यासाठी रेल्वे मिळणारं स्टेशन, पाहा कोणतं आहे हे स्टेशन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 13:52 IST2026-04-09T13:49:06+5:302026-04-09T13:52:05+5:30
Railway Interesting Facts : कुठे फिरायला जरी जायचं असेल तर रेल्वेची निवड केली जाते. कारण हा प्रवास वेगवेगळे अनुभव देणारा असतो. आज आम्ही आपल्याला देशातील एका अशा रेल्वे स्टेशनबाबत सांगणार आहोत, जिथून देशाच्या कानाकोऱ्यात जाण्यासाठी आपल्याला रेल्वे मिळू शकते.

ना मुंबई ना दिल्ली...'हे' आहे देशात कुठेही जाण्यासाठी रेल्वे मिळणारं स्टेशन, पाहा कोणतं आहे हे स्टेशन?
Railway Interesting Facts : भारतीय रेल्वेचं जाळं हे देशभरात तब्बल ६९, ४३९ किलोमीटर इतकं पसरलेलं आहे. देशात साधारण ७ हजारांपेक्षा अधिक रेल्वे स्टेशन आहेत. आपल्या कदाचित कल्पना नसेल पण देशात रोज २.५ कोटी लोक रेल्वेने प्रवास करतात. याच कारणामुळे जगातील सगळ्यात मोठ्या रेल्वे नेटवर्कमध्ये भारताचा चौथा नंबर लागतो. भारतातील अनेक रेल्वे स्टेशन हे काही खास कारणांमुळे चर्चेत असतात. प्रत्येक रेल्वे स्टेशनचं काहीना काही वेगळेपण असतं. म्हणजे एखादं रेल्वे स्टेशन दोन राज्यात विभागलेलं असल्याने, तर कधी एखादं रेल्वे स्टेशन आपल्या भव्यतेसाठी चर्चेत असतं. रेल्वेचा प्रवास हा स्वस्त आणि आरामदायक असल्याने यालाच पहिलं प्राधान्य दिलं जातं. कुठे फिरायला जरी जायचं असेल तर रेल्वेची निवड केली जाते. कारण हा प्रवास वेगवेगळे अनुभव देणारा असतो. आज आम्ही आपल्याला देशातील एका अशा रेल्वे स्टेशनबाबत सांगणार आहोत, जिथून देशाच्या कानाकोऱ्यात जाण्यासाठी आपल्याला रेल्वे मिळू शकते.
कोणत्या स्टेशनहून कुठेही जाता येईल?
उत्तर प्रदेशातील मथुरा हे देशातील सगळ्यात वेगळं रेल्वे स्टेशन आहे. हे एकुलतं एक असं रेल्वे स्टेशन आहे जिथून देशातील कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला गाडी मिळेल. हे जंक्शन स्टेशन मध्य रेल्वेचं झोनचा भाग आहे. इथून उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम अशा चारही दिशांना जाण्यासाठी रेल्वे मिळते. काश्मीर ते कन्याकुमारी, गुजरात ते आसाम किंवा पूर्वोत्तरपर्यंत जवळपास सगळ्याच मुख्य शहरांसाठी आणि छोट्या स्टेशनसाठी इथून गाडी मिळते.
मथुरा रेल्वे स्टेशनहून रोज शेकडो रेल्वे ये-जा करतात. प्रवासी दुसऱ्या कोणत्या स्टेशनवर जाण्याऐवजी इथून कनेक्टिंग रेल्वे मिळवू शकतात. भगवान श्रीकृष्णाची नगरी मथुरेच्या या स्टेशनला धार्मिक महत्व तर आहेच, सोबतच हे स्टेशन रेल्वे हबच्या रूपाने देशाला जोडणारा दुवा आहे. या स्टेशनवर प्रवाशांना मोठी सुविधा दिली जाते. जर आपल्याला पूर्ण देश एक्सप्लोर करायचा असेल तर मथुरा जंक्शन आपल्यासाठी परफेक्ट असेल.
परदेशी पर्यटकांची पसंती
जगातील वेगवेगळ्या देशातील पर्यटक भारतात प्रवासाचे व्लॉग करतात. त्यात ते भारतीय रेल्वे आणि स्टेशनांचं कौतुक करताना दिसतात. कारण रेल्वेचं तिकीट स्वस्त असतं आणि प्रवास आरामदायक असतो. भारतीय रेल्वेच्या माध्यमातून देशाचा कानाकोपरा एकमेकांना जोडला जातो. प्रवासादरम्यान सुंदर निसर्ग, वेगवेगळी शहरं, शेतं बघायला मिळतात. लोकांशी संवाद वाढतो. नवनवीन गोष्टीही माहिती पडतात.