'या' गावात जन्माला येतात केवळ मुली, याचं कारण शोधण्यात वैज्ञानिकही झाले फेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 18:22 IST2022-05-02T18:20:30+5:302022-05-02T18:22:56+5:30

Jarahatke : तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, जगात एक असं गाव आहे जिथे  १२ वर्षांपासून एकही मुलगी जन्माला आलेला नाही.

Only girls are born in miejsce odrzanskie village scientists failed to solve the mystery | 'या' गावात जन्माला येतात केवळ मुली, याचं कारण शोधण्यात वैज्ञानिकही झाले फेल

'या' गावात जन्माला येतात केवळ मुली, याचं कारण शोधण्यात वैज्ञानिकही झाले फेल

Mysterious Village: जगात वेगवेगळे रहस्य आहेत. या जगात अशी अनेक ठिकाणं आहेत ज्यांच्या रहस्यांबाबत तुम्हाला क्वचितच माहिती असेल. जेव्हा या रहस्यांबाबत समजतं तेव्हा तुम्हाला विश्वासही बसत नाही की, अखेर हे शक्य कसं आहे? आज आम्ही तुम्हाला एका अशाच गावाबाबत सांगणार आहोत ज्याबाबत वाचून तुम्ही थक्क व्हाल. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, जगात एक असं गाव आहे जिथे  १२ वर्षांपासून एकही मुलगा जन्माला आलेला नाही.

द न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, हे रहस्यमय गाव पोलॅंडमधील मिजेस्के ओद्रजेनस्की (Miejsce Odrzanskie) हे आहे. इथे गेल्या एक दशकापासून एकही मुलगी जन्माला आलेला नाही. गावात केवळ मुलींचा जन्म होतो. याबाबत परिसराच्या मेअरने २०१९ मध्ये एक आश्चर्य़कारक घोषणा केली होती. मेअर म्हणाले होते की, जर गावात कुणाच्या घरात मुलगा जन्माला आला तर ते त्या परिवाराला मोठं बक्षीस देतील.

या गावाबाबत वैज्ञानिकांना जेव्हा समजलं तेव्हा त्यांनी या विषयावर शोध केला होता. पण बराच शोध घेऊनही वैज्ञानिक कोणत्याही निष्कर्षावर पोहोचू शकलेले नाहीत. त्यांना काहीही उत्तर मिळालं नाही की या गावात मुलगा जन्माला का येत नाही. वैज्ञानिकांसोबतच पत्रकार आणि टेलिव्हिजनच्या लोकांनीही या गावावर बराच रिसर्च केला. पण अजूनही या गावाच्या रहस्याबाबत कुणालाही काही समजलं नाही.

या गावात साधारण ३० लोक राहतात. हे गाव तेव्हा चर्चेत आलं होतं जेव्हा अग्नीशामकाच्या यूश वॉलेंटिअर्ससाठी स्पर्धेत भाग घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात केवळ मुलीच आल्या होत्या. यानंतर या भागाच्या मेअर किस्टीना जिडजियाक यांनी गावाची स्थिती जरा विचित्र असल्याचं सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की, काही वैज्ञानिकांनी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला की, गावात केवळ मुलींचा जन्म का होतो? पण वैज्ञानिकांच्या हाती काहीच लागलं नाही.

Web Title: Only girls are born in miejsce odrzanskie village scientists failed to solve the mystery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.