थोडीसी तो लिफ्ट करादे म्हणत, जो आकाशात उडाला तो थेट किचनमध्ये जाऊन कोसळला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 18:36 IST2021-07-12T18:35:08+5:302021-07-12T18:36:25+5:30
थोडीसी तो लिफ्ट करादे हे गाणं तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचं. पण लिफ्ट करता करता लँडिंग डायरेक्ट शेवटच्या फ्लोरवर झाली तर काय करायचं?

थोडीसी तो लिफ्ट करादे म्हणत, जो आकाशात उडाला तो थेट किचनमध्ये जाऊन कोसळला...
थोडीसी तो लिफ्ट करादे हे गाणं तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचं. पण लिफ्ट करता करता लँडिंग डायरेक्ट शेवटच्या फ्लोरवर झाली तर काय करायचं. प्लॅराग्लायडिंग करतानाचा अनुभव बऱ्याचजणांनी घेतला असेल. पण एका अमेरिकन सैनिकाने पॅराग्लाईडिंग करता करता डायरेक्ट एकाच्या किचनमध्ये लँडिग केली. न्युयोर्क पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार ही घटना दक्षिण कॅलिफोर्नियाची आहे. यात हा सैनिक लष्करी प्रशिक्षणामध्ये पॅराग्लायडिंगचा सराव करता होता. सरावा दरम्यान तो अचानक खाली कोसळला आणि घराचे छत पाडत थेट त्या घराच्या किचनमध्ये जाऊन पडला.
ज्यावेळी तो किचनमध्ये जाऊन पडला तेव्हा घरात कोणीही नव्हते. त्यामुळे घरातील मंडळी सुखरुप बचावली. पण हा सैनिक पडल्यानंतर बराचकाळ बेशुद्ध होता. त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. ज्या घरात तो पडला तिकडच्या मालकाने देखील जास्त काही नुकसान न झाल्याचे सांगितले.