स्वप्नात आला होता स्पर्म बॅंकेचा विचार, आज तब्बल ८० देशांमध्ये करतात स्पर्म सप्लाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 04:15 PM2020-02-13T16:15:45+5:302020-02-13T16:18:39+5:30

ते केवळ अंटार्टिकेत स्पर्म पाठवत नाहीत. कारण पेंग्विन्सना त्याची गरज नसते.

Ole Schou had a dream about frozen sperm and he created world largest sperm bank | स्वप्नात आला होता स्पर्म बॅंकेचा विचार, आज तब्बल ८० देशांमध्ये करतात स्पर्म सप्लाय!

स्वप्नात आला होता स्पर्म बॅंकेचा विचार, आज तब्बल ८० देशांमध्ये करतात स्पर्म सप्लाय!

Next

२०१२ मध्ये एक सिनेमा आला होता 'विकी डोनर'. हा सिनेमा स्पर्म डोनेशन आणि स्पर्म बॅंकवर आधारित होता. या सिनेमामुळेच भारतीय लोकांमध्ये स्पर्म डोनेशनबाबत उत्सुकता वाढली होती. त्यानंतर परदेशात होत असलेल्या स्पर्म डोनेशवर अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. पण भारतात आजही स्पर्म डोनेशनकडे संकुचित विचाराने पाहिले जाते. पण गेल्या काही वर्षात आयव्हीएफ उपचार पद्धती वाढली आहे.

स्पर्म बॅंक प्रत्येक देशात आहे. पण जगातली सर्वात मोठी स्पर्म बॅंक डेनमार्कमध्ये आहे. ही बॅंक सायरोस इंटरनॅशनल नावाने ओळखली जाते. ब्रिटीश वृत्तपत्र मिररशी बोलताना या बॅंकेकडून सांगण्यात आलं होतं की, ते केवळ अंटार्टिकेत स्पर्म पाठवत नाहीत. कारण पेंग्विन्सना त्याची गरज नसते.

(Image Credit : businessinsider.com)

डेनमार्कच्या आरहस शहरातील स्पर्म बॅंक जर्मनी, बेल्जिअ, रोमानिया, सायप्रस, फिनलॅंड, कोपेनहेगन, नेदरलॅंड आणि रशियातसहीत अनेक देशांमध्ये दररोज स्पर्म सप्लाय करते. या स्पर्म बॅकेची सुरूवात १९८७ मध्ये करण्यात आली होती. ३३ वर्षांनंतर या बॅंकेने आवाका वाढवला आहे. आता ही बॅंक ८० देशांमध्ये स्पर्म पाठवते आणि आतापर्यंत २७ हजार बाळांना येथून नेण्यात आलेल्या स्पर्मचा वापर करून जन्म देण्यात आलाय.

३० पाउंड ते ३०० पाउंड असते किंमत

या बॅंकेतून स्पर्म वापरण्याची किंमत ३० पाउंड(2,779.12 रूपये) ते ३०० पाउंड असते. ही किंमत डोनरची ओळख न सांगणे ते देशानुसार ठरत असते. म्हणजे जर स्पर्म एखाद्या माहीत असलेल्या डोनरचे असतील तर किंमत जास्त असेल. तसेच कोणत्या देशातील स्पर्म आहे यावरही किंमत ठरते. येथील स्पर्मचा वर्षभरात वापर केवळ यूकेमध्ये १० टक्के होतो. वर्षभरात यूकेमध्ये ३०० बाळ सायरोसच्या स्पर्म डोनेशन द्वारे जन्माला येतात.

स्वप्नात आला होता बॅंकेचा विचार

(Image Credit : blog.cryosinternational.com)

या बॅंकेची स्थापना शोऊ ओले नावाच्या व्यक्तीने केली होती. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांना याबाबत स्वप्न पडलं होतं. १९८१ मध्ये त्यांनी केवळ ग्रॅज्यूएशन केलं होतं आणि त्याच वर्षी त्यांना स्पर्म बॅंक उघडण्याचं स्वप्न आलं होतं.

सिंगल मदरची संख्या वाढली

(Image Credit : news.com.au)

सायरोसच्या ग्राहकांमध्ये गेल्या काही वर्षात सिंगर मदरची संख्या वेगाने वाढली आहे. ज्या महिला करिअरमध्ये यशस्वी आहेत, पण त्यांना लग्न करायचं नाही अशा महिला सायरोसची मदत घेत आहेत. सायरोसमध्ये जास्तीत जास्त स्पर्म डोनर हे आहरसच्या युनिव्हर्सिटीतीलच आहेत.


 

Web Title: Ole Schou had a dream about frozen sperm and he created world largest sperm bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.