हायवेवर ट्रक चालवत असताना वृद्ध पडला बेशुद्ध, लोकांनी 'असा' वाचवला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 17:30 IST2021-08-02T17:30:03+5:302021-08-02T17:30:34+5:30
अमेरिकेच्या अटलांटामध्ये हायवेवरून एक वृद्ध ड्रायव्हर जात होता. अचानक असे काही झाले की त्याची गाडी रस्त्यातच थांबली आणि आजूबाजूला सर्व लोक जमा झाले...

हायवेवर ट्रक चालवत असताना वृद्ध पडला बेशुद्ध, लोकांनी 'असा' वाचवला जीव
अमेरिकेच्या अटलांटामध्ये हायवेवरून एक वृद्ध ड्रायव्हर जात होता. अचानक असे काही झाले की त्याची गाडी रस्त्यातच थांबली आणि आजूबाजूला सर्व लोक जमा झाले.
ही घटना अटलांटा येथील हायवेवरील आहे. एक वृद्ध ड्रायव्हर ट्रक चालवत जात होता तेवढ्यात त्याच्या ट्रकचा स्पीड कमी होऊ लागला. भर हायवेवर गाड्यांमध्ये असे झाल्याचे लोकांच्या लक्षात येताच लोक त्याच्या मदतीला धावले, सर्वांच्या लक्षात आलं की त्याची तब्येत बिघडली आहे.
सुरुवातीला लोकांना वाटलं की तिथे काही भांडण चालू आहे का. जवळ गेल्यावर लक्षात आलं की ट्रकमधला वृद्ध चालक गाडी चालवतानाच बेशुद्ध पडला आहे. त्याला त्या अवस्थेत दरवाजा उघडता येत नव्हता. तिथे असलेल्या एका महिलेने त्याची खिडकी तोडण्याचा प्रयत्न केला पण खि़डकी तुटत नव्हती. त्याची तब्येत आणखी खराब होण्याआधी त्याला तिथुन बाहेर काढणे गरेजेचे होते.
लोकांनी मागील बाजूने जाऊन त्या बाजूच्या काचा तोडण्याचा प्रयत्न सुरु केला. काहीवेळाने त्या वृद्धाला बाहेर काढण्यात यश आले. त्याला वेळीच बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला.