'आता महिनाभर उल्टी करेल...'! बॉयफ्रेंडनं केली फसवणूक, मग तरुणीनं घेतला असा बदला; कौतुक करताय लोक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 13:25 IST2024-03-01T13:24:20+5:302024-03-01T13:25:22+5:30
नुकतेच, एक महिलेने ब्रेकअपनंतर आपल्या एक्स बॉयफ्रेंडसोबत असे काही केले, जे जाणून तुम्हालाही थक्क व्हाल आणि तिचे कौतुक कराल...

'आता महिनाभर उल्टी करेल...'! बॉयफ्रेंडनं केली फसवणूक, मग तरुणीनं घेतला असा बदला; कौतुक करताय लोक
विवाहित जोडपे असो अथवा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड अनेक वेळा एक पार्टनर दुसऱ्या पार्टनरला धोका दिल्याची प्रकरणे समोर येतात. अशा परिस्थितीत दोका मिळालेली व्यक्ती रडत बसतात अथवा बदला घेण्याचा विचार करतात. आजकाल तर काही लोक सोशल मीडियावरही व्यक्त होताना दिसतात. मात्र नुकतेच, एक महिलेने ब्रेकअपनंतर आपल्या एक्स बॉयफ्रेंडसोबत असे काही केले, जे जाणून तुम्हालाही थक्क व्हाल आणि तिचे कौतुक कराल...
असा घेतला बदला -
आपल्या धोकेबाज बॉयफ्रेंडचा बदला घेतल्याचा खुलासा केल्यानंतर, संबंधित महिलेचे सोशल मीडियावर जबरदस्त कौतुक होत आहे. संबंधित महिलेचे नाव आहे जेमी. एकाच घरात राहत असूनही आपल्या एक्स बॉयफ्रेंडने आपल्याला फसवल्याचे जेमीच्या लक्षात आले. त्याला पकडल्यानंतर तिने त्याला सोडून दिले. यानंतर, संबंधित घर सोडण्यापूर्वी जेमी आपल्या एक्स-बॉयफ्रेंडसोबत बदला घेण्याचा विचार करत होती. मात्र कुठलेही बेकायदेशीर कृत्य करून तिला पोलिसांच्या जाळ्यात अडकायचे नव्हते.
घराच्या कानाकोपऱ्यात लपवली अशी गोष्ट -
जेमीने टिकटॉक @glitteremcee हँडलवर पोस्ट करत म्हटले आहे की, घरातून बाहेर पडताना मी घराच्या काना कोपऱ्यात फ्रोजन फिश लपवून ठेवले, जे लवकरच सडून घरात दुर्गंधी पसरेल. तिने सांगितले की, तिने घराच्या कानाकोपऱ्यापासून ते सोफा आणि छोट-छोट्या छिद्रांतही सडण्यासाठी फीश ठेवले आहेत. लोक महिलेच्या या बदल्याचे जबरदस्त कौतुक करत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले आहे, "काय सही आयडिया आहे, तर एका ने लिहिले, दुर्गंधीमुळे महिनाभर उल्टी करेल."