Blade Interesting Facts : भलेही ट्रिमरने बाजारात मोठी जागा मिळवली असली तरी आजही बरेच लोक दाढी करण्यासाठी ब्लेड आणि रेजरचा वापर करतात. घरी दाढी करताना किंवा सलूनमध्ये सुद्धा ब्लेड - रेजरचा वापर केला जातो. ब्लेडचा वापर इतरही अनेक छोट्या-मोठ्या कामांसाठी केला जातो. आपणही ब्लेड अनेकदा वापरलं असेल. बाजारात वेगवेगळ्या ब्रँडचे ब्लेड मिळतात. पण आपण एक गोष्ट नोटीस केलीये का की, ब्लेड कोणत्याही कंपनीचं असू देत त्याच्या मधलं जे डिझाइन आहे ते एकसारखंच असतं. सगळ्या ब्लेडमध्ये एकसारखंच डिझाइन का असतं? हेच आज आपण समजून घेणार आहोत.
ब्लेडचं डिझाइन कुणी तयार केलं?
जिलेटचं ब्लेड तर आपण नेहमीच वापरत असाल, पण आपल्याला हे माहीत नसेल की, जिलेट कंपनीचा संस्थापक किंग कॅप जिलेटने १९०१ मध्ये आपला सहकारी विलियम निकर्सनसोबत मिळून ब्लेडचं डिझाइन तयार केलं. त्यावेळीही तसंच डिझाइन होतं जसं तुम्ही आता बघता. किंग कॅप जिलेटने डिझाइन तयार केल्यावर त्याचं पेटेंट करून घेतलं आणि १९०४ मध्ये याचं उत्पादन सुरू केलं.
ब्लेडच्या मधे का आहे खास डिझाइन?
१९०१ मध्ये जिलेट ही रेजर आणि ब्लेड तयार करणारी एकुलती एक कंपनी होती. त्यावेळी रेजरमध्ये ब्लेड बोल्टच्या मदतीने फिट करावं लागत होतं. त्यामुळे ब्लेडच्या मधोमध अशाप्रकारचं डिझाइन तयार केलं गेलं. सर्वातआधी जिलेटने ब्लू जिलेट नावाने एक ब्लेड तयार केलं होतं. १९०४ मध्ये पहिल्यांदा केवळ १६५ ब्लेड तयार केले होते.
नंतर मार्केटमध्ये ब्लेड तयार करणाऱ्या दुसऱ्या कंपनी सुद्धा आल्यात. यावेळी जिलेटचं ब्लेडच्या डिझाइनचं पेटेंट संपलं होतं. त्यामुळे इतर कंपन्यांनी ब्लेडचं जुनंच डिझाइन कॉपी केलं. कारण कंपन्यांसमोर अडचण ही होती की, त्यावेळी रेजर केवळ जिलेट कंपनीचेच येत होते. त्यामुळे त्या रेजरमध्ये ब्लेड फिट बसावं म्हणून डिझाइन तसंच ठेवण्यात आलं.
कशी आली ब्लेडची आयडिया?
१८९० मध्ये जिलेट कंपनीचा संस्थापक किंग कॅप जिलेट बॉटलचं झाकण तयार करणाऱ्या कंपनीमध्ये सेल्समनचं काम करत होता. नोकरीदरम्यान त्याने पाहिले की, लोक झाकणांचा वापर केल्यावर ते फेकून देतात. तरीही इतक्या छोट्या वस्तूमुळे कंपनी चालवली जाते.
अशात त्याने अशी वस्तू तयार करण्याचा विचार केला जी स्वस्त असावी आणि वापरल्यावर फेकता यावी. त्यावेळी लोक लोखंडी वस्तऱ्याने शेविंग करत होते. पण वस्तऱ्याने शेविंग करणं फारच घातक असायचं. इजा होण्याचा धोका असायचा. सोबतच त्याने वेळही जास्त लागत होता. किंग कॅपने वस्तऱ्याला पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्याने दोन्ही बाजूने धार असलेलं सेफ्टी रेजर तयार केलं.
Web Summary : Despite different brands, shaving blades share a design due to Gillette's early patent and razor compatibility. King Gillette invented the design in 1901, ensuring blades fit his razors. When the patent expired, other companies copied it to ensure their blades also fit Gillette razors, which were dominant then.
Web Summary : विभिन्न ब्रांडों के बावजूद, शेविंग ब्लेड एक ही डिज़ाइन साझा करते हैं क्योंकि जिलेट का शुरुआती पेटेंट था और रेजर संगतता थी। किंग जिलेट ने 1901 में डिज़ाइन का आविष्कार किया, जिससे यह सुनिश्चित हुआ कि ब्लेड उनके रेजर में फिट हों। जब पेटेंट समाप्त हो गया, तो अन्य कंपनियों ने इसे कॉपी कर लिया ताकि उनके ब्लेड भी जिलेट रेजर में फिट हो सकें, जो तब प्रमुख थे।