धक्कादायक! भावी पत्नीची हत्या करून मृतदेहासोबत पादरीनं लग्न केलं; कोर्टानं शिक्षेशिवाय सोडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 15:59 IST2021-09-05T15:58:58+5:302021-09-05T15:59:19+5:30

पाद्रीनं केली होणाऱ्या पत्नीची हत्या; गेल्याच वर्षी झाला होता साखरपुडा

in nigeria pastor marries fiancées dead body to avoid jail after murder | धक्कादायक! भावी पत्नीची हत्या करून मृतदेहासोबत पादरीनं लग्न केलं; कोर्टानं शिक्षेशिवाय सोडलं

धक्कादायक! भावी पत्नीची हत्या करून मृतदेहासोबत पादरीनं लग्न केलं; कोर्टानं शिक्षेशिवाय सोडलं

नायजेरियात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका पाद्रीनं त्याच्या होणाऱ्या पत्नीची हत्या करून तिच्या मृतदेहाशी विवाह केला. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यात पाद्रीनं कबर खोदून त्यात असलेला मृतदेह बाहेर काढून त्यासोबत लग्न करताना दिसत आहे. लग्न करून झाल्यानंतर पाद्रीनं मृतदेह पुन्हा पुरून टाकला. हा प्रकार पाहून सगळेच चक्रावले.

भावी पत्नीची हत्या करून मग तिच्या मृतदेहासोबत लग्न करणाऱ्या पादरीचं नाव डॉ. सक्सेस एमेका संडे असं आहे. गेल्या ५ वर्षांपासून तो चिओमा ओकेएला डेट करत होता. गेल्याच वर्षी दोघांचा साखरपुडा झाला. होणारी पत्नी गर्भवती असल्याचं फेब्रुवारीत डॉ. सक्सेस संडेला समजलं. लग्नाआधीच चिओमा गर्भवती असल्याचं समजताच संडे घाबरला. प्रतिमेला धक्का बसेल अशी भीती त्याच्या मनात होती. त्यामुळे संडेनं तिला डॉक्टरकडे नेलं नाही. त्यानं चिओमाला गर्भपाताच्या गोळ्या खायला दिल्या. त्यामुळे तिचा मृत्यू झाला.
 
डॉ. सक्सेस संडेला परिसरात बराच चर्चेत असतो. लवकर मूल नको असल्यानं त्यानं चिओमाला बोलावून तिला बेशुद्ध करण्यासाठी औषध दिलं. त्यानंतर तिचा गर्भपात केला. मात्र या प्रक्रियेदरम्यान गुंतागुंत झाली. त्यामुळे चिओमाचा मृत्यू झाला. संडेनं गर्भपाताची गोष्ट सगळ्यांपासून लपवली. मात्र शवविच्छेदन अहवालातून ही माहिती उघड झाली.

गर्भपाताची बाब समजताच चिओमाचे कुटुंबीय संतापले. संडेनं चिओमाच्या मृतदेहाशी विवाह करण्याची मागणी त्यांनी केली. त्यासाठी त्यांनी दबाव टाकण्यास सुरुवात केली. डॉ. संडेनं त्यांची मागणी मान्य केली. त्यामुळे चिओमाच्या कुटुंबानं संडेला माफ केलं. त्यामुळे पाद्रीला तुरुंगवास झाला नाही. कोर्टानं त्याची निर्दोष मुक्तता केली. तो आताही चर्चमध्ये प्रार्थनेसाठी, शाळेत शिकवायला जातो.

Web Title: in nigeria pastor marries fiancées dead body to avoid jail after murder