'या' तरूणाला मिळालं नवं जीवन, डॉक्टरांनी लावला दुसऱ्याचा चेहरा आणि दोन्ही हात...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 12:05 PM2021-02-04T12:05:30+5:302021-02-04T12:13:06+5:30

तज्ज्ञांचं मत आहे की, एनवाययू लॅनगोन हेल्थमध्ये झालेल्या या सर्जरीला यशस्वी मानलं जात होतं. पण असं ठामपणे म्हणण्यात थोडी वाट पाहणं गरजेचं होतं.

New Jersey man Joe Dimeo got new face hand in transplant surgery now learning how to smile pinch | 'या' तरूणाला मिळालं नवं जीवन, डॉक्टरांनी लावला दुसऱ्याचा चेहरा आणि दोन्ही हात...

'या' तरूणाला मिळालं नवं जीवन, डॉक्टरांनी लावला दुसऱ्याचा चेहरा आणि दोन्ही हात...

Next

आपल्या आव्हानात्मक फेस आणि हॅंड ट्रान्सप्लांटच्या साधारण सहा महिन्यांनंतर जो डीमियो आता पुन्हा हसू लागलाय, शिंकणे, डोळ्यांची उघडझाप आणि चिमटा काढणं शिकत आहे. अमेरिकेत राहणाऱ्या २२ वर्षीय जो डीमिओचं हे आव्हानात्मक ऑपरेशन ऑगस्ट २०२० मध्ये करण्यात आलं होतं. एका कार अपघातात त्याचा चेहरा पूर्णपणे भाजला होता.

तज्ज्ञांचं मत आहे की, एनवाययू लॅनगोन हेल्थमध्ये झालेल्या या सर्जरीला यशस्वी मानलं जात होतं. पण असं ठामपणे म्हणण्यात थोडी वाट पाहणं गरजेचं होतं. अमेरिकी ट्रान्सप्लांट सिस्टीमला बघणारी संस्था यूनायटेड नेटवर्क फॉर ऑर्गन शेअरींगनुसार जगभरातील सर्जन कमीत कमी १८ फेस ट्रान्सप्लांट आणि ३५ हॅंड ट्रान्सप्लाट करतात. पण एकत्र फेस आणि हात ट्रान्सप्लांट करणं फार दुर्मीळ आहे. अस आधी फक्त दोनदा झालं आहे.

असं ऑपरेशन आधी २००९ मध्ये पॅरिसमध्ये एका रूग्णावर करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण एका महिन्यात काही समस्यांमुळे तो रूग्ण मरण पावला होता. त्यानंतर २०११ मध्ये बोस्टनच्या डॉक्टरने एका महिलेचं अशाप्रकारचं ऑपरेशन केलं होतं. तिला चिम्पांजीने जखमी केलं होतं. पण काही दिवसातच या महिलेचे ट्रान्सप्लांट केलेले हात काढावे लागले होते.

न्यू जर्सीचा जो डीमियोला आता आयुष्यभर उपचार घ्यावे लागतील. जेणेकरून त्याच्या शरीराने ट्रान्सप्लांट केलेला चेहरा आणि हात नाकारू नये. त्यासोबत त्याला याचंही प्रशिक्षण मिळेल की त्याला कशाप्रकारे नव्या चेहऱ्याचा आणि हातांचा वापर करायचा आहे. २०१८ मध्ये जो डोमिओ एका ड्रग कंपनीत प्रॉडक्ट टेस्टर होता. एका दिवशी लागलेल्या आगीत त्याचं संपूर्ण शरीर जळालं होतं. त्यानंतर अनेक महिने तो हॉस्पिटलमध्ये होता आणि त्याच्यावर अनेक ऑपरेशन करण्यात आलेत.

पण जेव्हा डॉक्टरांना वाटलं की, पारंपारिक सर्जरी करून जो डीमिओ ठिक होणार नाही. त्यामुळे त्यांनी २०१९ मध्ये डीमिओच्या ट्रान्सप्लांट सर्जरीची तयारी सुरू केली होती. त्यासाठी एका डोनरची गरज होती. डॉक्टरांना अंदाज होता की डीमिओकडे केवळ ६ टक्के चान्स आहे की, त्याच्या इम्यून सिस्टीमनुसार त्याला मॅच मिळेल.

ऑगस्ट २०२० मध्ये डॉक्टरांना डेलावेरमध्ये एक डोनर मिळाला आणि डीमिओचं कठिण ऑपरेशन करण्यात आलं. ऑपरेशननंतर भीती ही होती की, डीमिओच्या शरीराने नवा चेहरा आणि हात नाकारू नये. पण असं झालं नाही. त्याच्या शरीरात असे कोणतेही संकेत मिळाले नाही.
 

Web Title: New Jersey man Joe Dimeo got new face hand in transplant surgery now learning how to smile pinch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.