नॅशनल क्रश प्रियाची सोशल मीडियावर पुन्हा हवा; चाहते म्हणाले वा वा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2018 12:10 IST2018-05-04T12:10:44+5:302018-05-04T12:10:44+5:30

गाण्याबरोबरच प्रियाचा कांजीवारम साडीतील लूकही तितकाच भुरळ पाडणार आहे.

National Crush Priya Varrier new singing video get viral on Social Media | नॅशनल क्रश प्रियाची सोशल मीडियावर पुन्हा हवा; चाहते म्हणाले वा वा!

नॅशनल क्रश प्रियाची सोशल मीडियावर पुन्हा हवा; चाहते म्हणाले वा वा!

मुंबई: काही दिवसांपूर्वी आपल्या नयनबाणांनी अनेकांना घायाळ करणारी प्रिया प्रकाश वॉरियर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 'ओरू आडार लव्ह' या चित्रपटातील तिचा डोळ्याच्या भुवया आकर्षकपणे उडवतानाचा तिचा काही सेकंदांचा व्हीडिओ प्रचंड लोकप्रिय ठरला होता. त्यानंतर प्रिया रातोरात सेलिब्रिटी झाली होती. अनेकांनी तिला 'नॅशनल क्रश' अशी बिरुदावली बहाल केली होती. त्यानंतर गेले काही दिवस प्रियाच्या नावाची म्हणावी तशी चर्चा नव्हती. परंतु नुकत्याच समोर आलेल्या एका व्हीडिओमुळे प्रियाच्या नावाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. या व्हीडिओत प्रिया अर्जून कपूरच्या मुबारकां चित्रपटातील 'हवा हवा' हे गाणे गाताना दिसत आहे. गाण्याबरोबरच प्रियाचा कांजीवारम साडीतील लूकही तितकाच भुरळ पाडणार आहे. 'हवा हवा' गाताना प्रियाच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहतानाही दिसत आहे. अनेक दिवसांनी प्रियाला अशा रूपात पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.  व्हॅलेंटाईन डेच्या काही दिवस आधी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हीडिओमुळ प्रिया रातोरात सेलिब्रिटी झाली होती. त्यानंतर तिच्या फॉलोअर्सची संख्या प्रचंड वाढली होती. 

Web Title: National Crush Priya Varrier new singing video get viral on Social Media