वैज्ञानिकांना मंगळ ग्रहावर सापडली 'एलियनची स्मशानभूमी'? फोटो बघून सगळेच झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 03:55 PM2021-11-17T15:55:52+5:302021-11-17T16:02:57+5:30

NASA mars rover : वैज्ञानिकांना आजपर्यंत असे ठोस पुरावे मिळाले नाही ज्यावरून हे ठामपणे म्हणता येईल की, पृथ्वीशिवाय दुसऱ्या ग्रहावर जीवन आहे.

NASA mars rover sends photos of red planet looks like aliens cemetery | वैज्ञानिकांना मंगळ ग्रहावर सापडली 'एलियनची स्मशानभूमी'? फोटो बघून सगळेच झाले हैराण

वैज्ञानिकांना मंगळ ग्रहावर सापडली 'एलियनची स्मशानभूमी'? फोटो बघून सगळेच झाले हैराण

Next

पूर्वीपासूनच लोकांना पृथ्वीशिवाय आणखी कुठे लोक राहतात का? दुसऱ्या ग्रहावर आणखी जीव आहे का? हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. इतकंच काय तर जगभरातील वैज्ञानिकही अनेक वर्ष इतर ग्रहावरील जीवन शोधतात. पण वैज्ञानिकांना आजपर्यंत असे ठोस पुरावे मिळाले नाही ज्यावरून हे ठामपणे म्हणता येईल की, पृथ्वीशिवाय दुसऱ्या ग्रहावर जीवन आहे.

जगभरातील वैज्ञानिक दुसऱ्या ग्रहांवर पाणी किंवा ऑक्सीजनचा शोध घेत आहेत. तेच काही ग्रहांवर तर वैज्ञानिकांना आशेची किरणही दिसली आहे. यात मंगळ ग्रह सर्वात पुढे आहे. नासानेमंगळ ग्रहाचे काही नवे फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

काही महिन्यांपूर्वी नासाने मंगळ ग्रहावर मार्स रोव्हर पाठवल होता. नासाच्या मार्स रोव्हरने स्पेस एजन्सीच्या माध्यमातून मंगळ ग्रहावरील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोवरून मंगळ ग्रहाचे अनेक रहस्य उलगडतात. मंगळ ग्रहावरील हे फोटो पाहून लोक याला स्मशानभूमी मानत आहेत. लोकांनी दावा केला की, मंगळ ग्रहावर आधी लोक राहत होते. हे त्याच लोकांचं कब्रस्तान आहे. फोटो लाल ग्रहावर मोठमोठाले डोंगर दिसत आहेत.

नासाने रोव्हर गेल्यावर्षी जुलैमध्ये मंगळ ग्रहावर पाठवलं होतं आणि हा रोव्हर फेब्रुवारी २०२२ पर्यंत मंगळ ग्रहाचे फोटो पाठवेल. मार्स रोव्हरचं एक ट्विटर  अकाउंट तयार केलं आहे. ज्यावर नासा रोव्हर द्वारे पाठवण्यात आलेले फोटो अपलोड केले जातात. मंगळ ग्रहावरील फोटो बघण्यासाठी लोक फार उत्सुक असतात. सध्या जे फोटो समोर आले आहेत लोक त्याला एलियनचं कब्रस्तान म्हणत आहेत. 

रोव्हर सतत मार्सचे फोटो शेअर करत आहे. तेच नासाने याच्या माध्यमातून आणखी रहस्य उलगडण्याची आशा व्यक्त केली आहे. ट्विटरवर दगडांचे हे फोटो पाहून सगळेच हैराण झाले आहेत. काही लोकांना या फोटोंमध्ये एक एलियनही दिसत आहे. तेच एका यूजरने लिहिलं की, दगडांच्या खाली काय दडलं आहे? यात एलियनचे मृतदेह तर नाही ना?
 

Web Title: NASA mars rover sends photos of red planet looks like aliens cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app