(Image Credit : chinadaily.com.cn)
जगात असे अनेक लोक आहेत ज्यांच्या डोक्यात सतत काहीतरी वेगळं करण्याचा प्लॅन सुरू असतो. अशाच एक चीनची महिला आहे लियू यान(२५). तिने एक अनोखं म्युझिअम सुरू केलं आहे. या म्युझिअममध्ये प्रेयसी-प्रियकरांच्या विचित्र वस्तू बघायला मिळतात. या म्युझिअमचं नाव 'म्युझिअम ऑफ ब्रोकन रिलेशनशिप' म्हणजे 'तुटलेल्या नात्यांचं संग्रहालय' ठेवण्यात आलं आहे.
लियू यानने हे म्युझिअम हेइलोंगजियांग प्रांताच्या हार्बिन शहरात सुरू केलं आहे. या अनोख्या म्युझिअमला सुरू होऊन केवळ १० ते १२ दिवस झाले आहेत. पण आतापर्यंत १५ हजारपेक्षा जास्त कपल्स हे बघण्यासाठी येऊन गेलेत. या म्युझिअममध्ये तुम्हाला त्या वस्तू बघायला मिळतील ज्या प्रेयसी किंवा प्रियकरांनी नातं संपल्यानंतरही सांभाळून ठेवल्या होत्या.
लियू यान हिने हे अनोखं म्युझिअम सुरू करण्यापूर्वी वेगवेगळ्या सोशल साइट्सवर एक पोस्ट टाकली होती. यातून तिने ब्रेकअपशी निगडीत वेगवेगळ्या वस्तू मागितल्या होत्या. अशा वस्तू ज्या बघण्यासाठी लोक म्युझिअमपर्यंत येतील.
लियू याननुसार, सोशल मीडियात पोस्ट टाकल्यावर जगभरातून तिला हजारो कॉल्स आलेत. यादरम्यान तिने लोकांच्या अर्धवट राहिलेल्या प्रेमकथा ऐकल्या आणि त्यातून तिने ५० लोकांकडून जवळपास १०० अशा वस्तू मागितल्या, ज्या खास आणि अनोख्या आहेत.
म्युझिअममध्ये ज्या खास आणि अनोख्या वस्तू ठेवल्या आहेत, त्यात अनेक रेल्वे तिकीट, लव्ह लेटर्स, शूज, कीपॅड मोबाइल आणि लग्नाचा ड्रेस इत्यादींचा समावेश आहे. लियूने सांगितले की, या म्युझिअममध्ये ठेवण्यात आलेल्या प्रत्येक वस्तूमागे एक गोष्ट आहे. त्यातील काही वेदनादायी आहेत, ज्या तुम्हाला रडायला भाग पाडतील.
हे अनोखं म्युझिअम सुरू करण्यापूर्वी लियू एक टूरिस्ट गाइड म्हणूण काम करत होती. यादरम्यान तिला अनेक लव्हस्टोरी ऐकायला मिळाल्या आणि त्याचं कारणही अजब होतं. त्यावरूनच तिला हे अनोखं म्युझिअम सुरू करण्याची आयडिया आली. हे म्युझिअम सुरू करण्यासाठी लियूने २० लाख रूपये खर्च केले आहेत.