जबरदस्त आयडिया! आता हात न लावता वाजणार मंदिरातील घंटा, कारण वाचून म्हणाल, 'हाच खरा भारत'!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 03:10 PM2020-06-13T15:10:22+5:302020-06-13T15:39:19+5:30

मंदिरात जाऊन कोरोनाच्या भीतीमुळे घंटा वाजवत नसाल तर आता तुम्हाला घंटा हात न लावता वाजवता येणार आहे.

MP man has installed contactless bell at pashupatinath temple | जबरदस्त आयडिया! आता हात न लावता वाजणार मंदिरातील घंटा, कारण वाचून म्हणाल, 'हाच खरा भारत'!

जबरदस्त आयडिया! आता हात न लावता वाजणार मंदिरातील घंटा, कारण वाचून म्हणाल, 'हाच खरा भारत'!

googlenewsNext

कोरोनामुळे अनेक वाईट गोष्टी घडल्या असल्या तरी अनेक नवीन गोष्टीही जन्माला आल्या आहेत. आता हेच बघा ना...हे आहेत नाहरू खान. नाहरू खान हे यूट्यूबवर व्हिडीओ बघून भन्नाट वस्तू तयार करतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी सॅनिटायजिंगची एक भारी ऑटोमेटेड मशीन तयार केली होती. त्यांच्या या मशीन लोकांकडून कौतुकही करण्यात आलं होतं. आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी सेंसरची घंटा तयार केलाय. 

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, सेन्सरच्या अनेक वस्तू पाहिल्या, पण हे सेन्सर असलेली घंटी काय प्रकरण आहे. तर हा असा घंटा आहे जो हात न लावता तुम्ही वाजवू शकता. नुकताच हा घंटा पशुपतिनात मंदिरात लावण्यात आलाय.

 

आता 'अनलॉक 1'नुसार धार्मिक स्थळे, मॉल्स आणि रेस्टॉरन्ट सुरू करण्यात आली आहेत. पण कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी अनेक मंदिरांमध्ये घंटा झाकून ठेवण्यात आलाय नाही तर काढण्यात आलाय. अशात नाहरू खान यांच्या या इनोव्हेशनने लोकांच मन जिंकलंय.

नाहरू खान हे 62 वर्षांचे आहेत. ते मध्य प्रदेशातील मंदसौर येथे राहतात. त्यांनी एएनआय न्यूज एजन्सीला सांगितले की, 'आम्हाला आता मशिदीतून नमाजचा आवाज येऊ लागलाय. मग मी विचार केला की,  मंदिरातील घंट्याचा आवाजही यायला हवा'. झालं याच विचाराने त्यांनी सेंसर असलेला घंटा तयार करण्याचा निर्णय घेतला. हा घंटा प्रोक्सिमिटी सेंसरवर काम करतो. म्हणजे जसाही तुम्ही याच्या आजूबाजूला हात घेऊन जाल तेव्हा तो आपोआप वाजेल.

सोशल मीडियावर नाहरू खान यांच्या या इनोव्हेशनचं फार कौतुक होत आहे. लोक कमेंट करत आहेत की, हाच खरा भारत आहे. आता असाही दावा केला जात आहे की, पशुपतिनात मंदिर हे देशातील पहिलं सेंसर घंटा असलेलं मंदिर आहे.

आता हेलिकॉप्टरमध्येही फिरता येईल डबल सीट, 'या' पठ्ठ्यानंं ड्रोनपासून तयार केलं दोन सीटर हेलिकॉप्टर....

काळापुढे 'ते' ही  हरले! ३० वर्ष शिक्षकाची नोकरी केल्यानंतर मजुरीच्या कामाला लागले

Web Title: MP man has installed contactless bell at pashupatinath temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.