महिलेने सरकारला दिली नाही जमीन, हायवेच्या मधोमध कैद झालं घर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 16:45 IST2021-07-03T16:43:45+5:302021-07-03T16:45:19+5:30
एका महिलेने आपली जागा विकण्यास नकार दिला. बरेच वर्ष ती अडून बसली. यानंतर हायवे बांधण्यात आला आणि महिलेचं घर हायवेच्या मधोमध अडकून पडलं.

महिलेने सरकारला दिली नाही जमीन, हायवेच्या मधोमध कैद झालं घर
जेव्हा हायवे आणि पूल बांधले जातात तेव्हा लोकांच्या जमिनी त्यात जातात. ज्या बदल्यात सरकार लोकांना पैसे देतात. पण चीनच्या Guangzhou शहरात एक अशी घटना समोर आली आहे की, अशा कामांसाठी जमीन न दिल्यास काय होतं. चीनमध्ये एक हायवे बांधला जात होता. पण एक छोटसं घर त्यात अडचण ठरत होतं. सरकारने ती जमीन विकत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका महिलेने आपली जागा विकण्यास नकार दिला. बरेच वर्ष ती अडून बसली. यानंतर हायवे बांधण्यात आला आणि महिलेचं घर हायवेच्या मधोमध अडकून पडलं.
रिपोर्टनुसार, महिलेचं नाव Liang आहे. ती १० वर्षे चीन सरकारसोबत लढत होती. सरकार तिचं घर खरेदी करून तोडणार होते. जेणेकरून हायवे बांधता यावा. पण महिला काही ऐकली नाही. मग डेव्हलपर्सनी तिच्या छोट्या घराला चारही बाजूने एक मोटरवे पूल बनवला. आता या घराला Nail House नावाने ओळखलं जातं. कारण महिलेने हे घर तोडण्यासाठी सरकारकडून पैसे घेण्यास नकार दिला होता.
या Haizhuyong Bridge नावाच्या हायवेला २०२० मध्ये सुरू करण्यात आलं होतं. आता या छोटाशा घरात राहणारी महिला खिडकीतून रोज हजारो गाड्या बघत असते. मीडिया रिपोर्टनुसार, हे एक मजल्याचं घर ४० स्क्वेअर मीटरचं आहे. जे फोर लेन ट्रॅफिक लिंकमध्ये एका खड्ड्यात आहे. ज्यामुळे या घराची किंमत पडली आहे.
'मेलऑनलाइन'च्या रिपोर्टनुसार, महिलेने हे घर सोडलं नाही कारण सरकार तिला एका आयडिअल जागेवर प्रॉपर्टी देऊ शकत नव्हती. ती म्हणाली की, 'मी परिस्थितीचा मुकाबला करून जास्त आनंदी आहे. मी लोक काय विचार करतात याचा विचार करत नाही. मला वाटतं हे फार शांत, स्वतंत्र, सुखद आणि आरामदायक आहे. कदाचित पूल तयार होण्याआधीही असंच होतं'.
सरकारी अधिकारी म्हणाले की, त्यांनी २०१० मध्ये Haizhuyong Bridge च्या निर्माणासाठी हा फ्लॅट हटवण्याचा निर्णय घेतला होता. पण त्या फ्लॅटसोबत पूलाच्या निर्माणासाठी १० वर्षे लागली. अधिकाऱ्यांनुसार, घराची मालकीनीला काही फ्लॅट्ससोबत रक्कमही ऑफर केली गेली होती. पण तिने ऑफर नाकारली.