दोन मुलांच्या आईचे नवऱ्याच्या बहिणीशीच लग्न; पती म्हणतो, माझी हरकत नाही, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 09:51 IST2023-02-24T09:51:21+5:302023-02-24T09:51:48+5:30
महिला असून महिलेशीच लग्न का केले यावर ‘पति हुआ तो क्या हुआ..जहां प्रेम रहेगा, वहीं ना रहेंगे..शादी के बाद हम बहुत खुश हैं’ असे शुक्ला देवी माध्यमांना म्हणाली

दोन मुलांच्या आईचे नवऱ्याच्या बहिणीशीच लग्न; पती म्हणतो, माझी हरकत नाही, कारण...
बिहारमध्ये दोन मुलांची आई असलेल्या ३२ वर्षीय महिलेने लग्नाच्या १० वर्षांनंतर पतीच्याच धाकट्या बहिणीशी लग्न केल्याचे समोर आले आहे. १० वर्षांपूर्वी समस्तीपूर जिल्ह्याच्या रोजरा ब्लॉकमधील रहिवासी प्रमोद दास यांचा विवाह शुक्ला देवी (३२) सोबत झाला. वैवाहिक जीवन सुरळीत सुरू असताना ६ महिन्यांपूर्वी वेगळे वळण आले. शुक्ला देवी आणि प्रमोदची धाकटी बहीण सोनी (१८) प्रेमात पडले आणि लग्न करून पती-पत्नी म्हणून जगू लागले. ती आनंदी असेल तर मला हरकत नाही असे म्हणत पतीनेही आक्षेप घेतला नाही.
महिला असून महिलेशीच लग्न का केले यावर ‘पति हुआ तो क्या हुआ..जहां प्रेम रहेगा, वहीं ना रहेंगे..शादी के बाद हम बहुत खुश हैं’ असे शुक्ला देवी माध्यमांना म्हणाली. सोनीसोबत लग्नानंतर शुक्ला देवीने स्वतःचे नाव बदलून सूरज कुमार असे ठेवले, शिवाय पुरूषासारखे दिसण्यासाठी पुरूषांचे कपडेही घातले. तिने लिंगबदलाची योजनाही आखली होती परंतु शस्त्रक्रियेचे व्हिडिओ पाहून घाबरून योजना सोडली.
बदनामी झाल्यानंतर सासरचे घटनास्थळी पोहोचले आणि सोनीला जबरदस्तीने घेऊन गेले, त्यामुळे शुक्ला चिडली आणि पोलिसांत अपहरणाचा गुन्हा नोंदवला. त्यानंतरच हे अनोखे प्रकरण उघडकीस आले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.