चार मुलांच्या आईच्या डोक्यात घुसलं प्रेमाच भूत, पतीने जे केलं ते वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 13:11 IST2022-10-15T13:10:56+5:302022-10-15T13:11:12+5:30
पती श्रवणने पत्नी पूजाचं कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिचं लग्न लावून दिलं. ज्यांनाही याबाबत समजलं ते हैराण झाले.

चार मुलांच्या आईच्या डोक्यात घुसलं प्रेमाच भूत, पतीने जे केलं ते वाचून व्हाल अवाक्...
Love Story News: बिहारच्या भागरपूरमध्ये चार मुलांची आई प्रेमात अशी काही हरवली की, तिच्यासमोर पतीलाही झुकावं लागलं. पण नंतर पंचायतने हस्तक्षेप करून धक्कादायक खुलासा केला. भागलपूरच्या गनगनिया गावात एक पतीने पत्नीच्या इच्छेसाठी तिला तिच्या प्रियकराकडे सुपूर्द केलं. पती श्रवणने पत्नी पूजाचं कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिचं लग्न लावून दिलं. ज्यांनाही याबाबत समजलं ते हैराण झाले.
जशी ही घटना गावीताल लोकांना समजली, मोठ्या संख्येने लोक घराच्या आसपास जमा झाले. असं सांगितलं जातं आहे की, 2012 मध्ये श्रवणचं लग्न बांकाच्या फुल्लीडुमरमध्ये पूजासोबत झालं होतं. त्यानंतर जेव्हा पूजा सासरी आली आणि तेव्हा तिची भेट छोटूसोबत झाली. ज्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांची प्रेम इतकं वाढलं की, त्यांनी सोबत जगण्याची आणि मरणाची शपथ घेतली.
इकडे श्रवण आणि पूजाला चार मुले झाली. तर तिकडे पूजा आणि छोटूचं प्रेम प्रकरण सुरूच होतं. हळूहळू त्यांनी त्यांचं नातं पुढे नेण्याचं ठरवलं. जेव्हा याबाबत पूजाचा पती श्रवण याला समजलं तेव्हा त्याची प्रतिक्रिया हैराण करणारी होती. पती श्रवणने कायदेशीर कारवाई करत पत्नीला तिच्या प्रियकरासोबत सार केलं.