5 मुलांची आई पडली प्रेमात, लेकाच्या लग्नानंतर झाली नवरी; 24 वर्षीय तरुणासोबत घेतल्या सप्तपदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 13:39 IST2023-01-17T13:27:32+5:302023-01-17T13:39:32+5:30
एक विवाहित महिला एका तरुणाच्या प्रेमात पडली आणि नंतर लग्न केलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या महिलेला आधीच पाच मुलं आहेत.

5 मुलांची आई पडली प्रेमात, लेकाच्या लग्नानंतर झाली नवरी; 24 वर्षीय तरुणासोबत घेतल्या सप्तपदी
प्रेम आंधळं असतं. प्रेम हे कोणत्याही वयोगटातील लोकांवर होतं. अनेकांना एकदा का कोणाच्यातरी प्रेमात पडलं की त्याच्याशिवाय जग अपूर्णच वाटतं. असाच एक अजब प्रकार लखीमपूर खेरी येथून समोर आला आहे. जिथे एक विवाहित महिला एका तरुणाच्या प्रेमात पडली आणि नंतर लग्न केलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या महिलेला आधीच पाच मुलं आहेत. त्यामुळे या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण मोहम्मदी भागाशी संबंधित आहे. येथे राहणाऱ्या महिलेचे लग्न बजारिया गावातील व्यक्तीषी झाले होते. त्यानंतर तिला पाच मुले आहेत. एवढेच नाही तर महिलेच्या एका मुलाचे लग्नही झाले आहे. मुलाच्या लग्नानंतर ही महिला 24 वर्षीय तरुणाच्या प्रेमात पडली. दोघांची भेट होत राहिली. याबाबत कोणालाच माहिती नव्हती. महिला त्या तरुणाला गुपचूप भेटत असे.
आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मुलाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने आपल्या प्रियकरासोबत राहण्याचे ठरवले. महिला आणि तिच्या प्रियकराने एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि दोघेही मंदिरात पोहोचले. महिलेने सप्तपदी घेतल्या. त्यांच्या लग्नाची बातमी गावात पसरली. महिला आणि तिच्या प्रियकराने आता पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"