एक गृहप्रवेश असाही...! सुनेनं सासूला दिलं खास गिफ्ट, Video पाहून तुमचेही डोळे पाणावतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 17:25 IST2022-06-08T17:25:18+5:302022-06-08T17:25:54+5:30

सासू आणि सुनेचं नातं किती नाजूक असतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही. यात थोडीशी चूक देखील महागात पडते. काही जण तर सासू-सुनेच्या नात्याला विळी-भोपळ्याचं नातं असल्याचंही म्हणतात.

mother in law griha pravesh viral video on social media | एक गृहप्रवेश असाही...! सुनेनं सासूला दिलं खास गिफ्ट, Video पाहून तुमचेही डोळे पाणावतील

एक गृहप्रवेश असाही...! सुनेनं सासूला दिलं खास गिफ्ट, Video पाहून तुमचेही डोळे पाणावतील

सासू आणि सुनेचं नातं किती नाजूक असतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही. यात थोडीशी चूक देखील महागात पडते. काही जण तर सासू-सुनेच्या नात्याला विळी-भोपळ्याचं नातं असल्याचंही म्हणतात. पण तसे दिवस आता राहिलेले नाहीत. सोशल मीडियावर नेहमीच सासू आणि सुनेच्या नात्यावर वेगवेगळे मिम्स तयार केले जातात. पण खरंतर हेच नातं जगातील सर्वात अनमोल नातं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सासू आणि सूनेच्या नात्यातील गोडवा दाखवणारा असाच व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. 

सासू-सूनेच्या घट्ट नात्याचं दर्शन घडवणारा हा व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात अश्रू तरळल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओमध्ये एक सून आपल्या सासूचं घरात स्वागत करताना दिसते. संबंधित व्हिडिओ नेमका कुठला आहे याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी होऊ शकलेली नाही. पण प्रथम दर्शनी गुजराती कुटुंबातील हा व्हिडिओ असल्याचं दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये सुनेसह संपूर्ण कुटुंबीय सासूचा गृहप्रवेश करत असल्याचं दिसून येत आहे. 

२ मिनिटं २० सेकंदाच्या व्हिडिओत एक सासू लिफ्टमधून बाहेर आल्यानंतर आपल्या घरात प्रवेश करत असल्याचं दिसून येत आहे. पण घरात प्रवेश करण्याआधी सूनेनं सासूचं औक्षण केलं. सर्व कुटुंबीय देखील स्वागतासाठी उपस्थित होते. 

भावूक गाण्यासह सासूचा गृहप्रवेश
व्हिडिओमध्ये सासू गृहप्रवेश करत असताना एक गाणं देखील वाजत आहे. एका नववधूप्रमाणे सून आपल्या सासूचा गृहप्रवेश करत असल्याचं दिसून येत आहे. सासू आणि सुनेच्या या अनोख्या नात्याबद्दल सोशल मीडियात प्रतिक्रिया उमटत असून सर्वजण कौतुक करत आहेत. एका आयपीएस अधिकाऱ्यानंही संबंधित व्हिडिओ शेअर करत कुटुंबाचं कौतुक केलं आहे. 

"सूनेच्या गृहप्रवेशाचे अनेक व्हिडिओ आपण आजवर पाहिले असतील पण एका सासूचा गृहप्रवेश होत असल्याचा हा क्षण मोलाचा आहे. असा अनोखा व्हिडिओ आजवर तुम्ही पाहिला नसेल", अशा कॅप्शनसह व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 

Web Title: mother in law griha pravesh viral video on social media