शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सगळ्यात विषारी साप ज्याचं १ ग्रॅम विष ८ लाख रूपयांना मिळतं, वाचा कसं काढतात सापाचं विष आणि कसं बनवलं जातं औषध?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 11:48 IST

Snakes Poisonous Price : आपल्याला आश्चर्य वाटेल की, या इन्स्टिट्यूटला भारतीय कोब्रा, कॉमन क्रेट, रसेल वायपर आणि सॉ-स्केल्ड वायपर या सापांच्या हाय क्वालिटीच्या विषाला ई-लिलावात अपेक्षेपेक्षा जास्त किंमत मिळते.

Snakes Poisonous Price :  नेहमीच सापाच्या दंशाने मनुष्यांचा जीव गेल्याच्या घटना समोर येत असतात. WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या आकडेवारीनुसार दरवर्षी ५५ लाख लोकांची जीव सापांच्या दंशाने जातो. दरवर्षी हजारो लोकांचा जीव जातो. काही सापांचं विष इतकं खतरनाक असतं की, काही सेकंदात व्यक्तीचा जीव जातो. दुसरीकडे सापाचं विष अनेक औषधं बनवण्यासाठी देखील केला जातो. सापाच्या दंशाने होणाऱ्या मृत्यूचा दर कमी करण्यासाठी गुजरातमध्ये अँटी-व्हेनम औषधं बनवण्यावर काम सुरू आहे. यात धरमपुरीमधील स्नेक रिसर्च इन्स्टिट्यूट महत्वाची भूमिका बजावत आहे.

आपल्याला आश्चर्य वाटेल की, या इन्स्टिट्यूटला भारतीय कोब्रा, कॉमन क्रेट, रसेल वायपर आणि सॉ-स्केल्ड वायपर या सापांच्या हाय क्वालिटीच्या विषाला ई-लिलावात अपेक्षेपेक्षा जास्त किंमत मिळते. अशात आज आपण हे जाणून घेणार आहोत की, सापांचं विष कसं काढलं जातं आणि त्यापासून औषध कसं बनवलं जातं. सोबतच सगळ्यात विषारी साप कोणता आणि त्याच्या विषाची किंमत किती हेही जाणून घेऊया.

कसं काढलं जातं सापांचं विष? 

आपल्याला कदाचित कल्पना नसेल, पण सापांचं विष काढणं सगळ्यात कठिण काम असतं. हे काम खूप सावधगिरीने आणि एक्सपर्ट टीमच्या मदतीने केलं जातं. याला स्नेक मिल्किंग असंही म्हटलं जातं. या प्रोसेसमध्ये सापाचं तोंड उघडून ते एखाद्या डबीवर किंवा बॉटलवर दाबलं जातं, जेणेकरून त्याने सोडलेलं विष त्यात जमा व्हावं. 

कसं बनवलं जातं औषध? 

अँटी-व्हेनम तयार करण्याची प्रक्रिया सुद्धा फार किचकट असते. सापाचं विष काढल्यानंतर त्याचं शुद्धीकरण केलं जातं. वेगवेगळ्या सापांसाठी वेगवेगळे अँटी-व्हेनम तयार केले जातात. कारण प्रत्येक सापांच्या विषामध्ये वेगवेगळे विषारी तत्व असतात. अँटी-व्हेनम तयार करण्यासाठी बराच वेळही लागतो आणि पैसाही. अँटी-व्हेनम तयार करण्याचा उद्देश सापाच्या दंशामुळे होणारे मृत्यू रोखणं हा आहे.

कोणत्या सापांचं विष सगळ्यात महाग? 

इंडियन कोब्रा, रसल्स वायपर आणि किंग कोब्रा या सापांचं विष सगळ्यात महाग मानलं जातं. काही रिपोर्टनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात कोब्राच्या चांगल्या क्वालिटीच्या विषारी किंमत ५ ते १० हजार डॉलर प्रति ग्रॅम म्हणजेच ४ ते ८ लाख रूपये इतकी असते. तेच किंग कोब्राच्या विषाची किंमत १० हजार डॉलर प्रति ग्रॅम असते. किंग कोब्राच्या विषामध्य 'जो ओहानिन' नावाचं प्रोटीन असतं, जे वेदना कमी करण्याच्या कामात येतं. सगळ्यात विषारी सापांमध्ये डेजर्ट डॅथ ऐडरच्या एक ग्रॅम विषाला ३ हजार डॉलर, ब्राउन स्नेकच्या विषााला ४ हजार डॉलर आणि कोरल स्नेकच्या विषाला ४ हजार डॉलर प्रति ग्रॅम इतकी किंमत मिळते.

English
हिंदी सारांश
Web Title : Venomous Snakes: Extracting Poison and Making Medicine; Price Per Gram

Web Summary : Snake venom, used to create antivenom, is extracted carefully by experts. Cobra venom fetches high prices, up to $10,000 per gram, due to its medicinal properties. The antivenom production process is complex, requiring specific treatments for different snake venoms to combat snakebite fatalities.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सsnakeसापJara hatkeजरा हटके