जगातील सगळ्यात मौल्यवान लाकडांबाबत माहित्येय का? चंदनाच्या लाकडापेक्षाही १० पटीने महाग...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 06:40 PM2020-06-08T18:40:12+5:302020-06-08T18:47:47+5:30

धरतीवर असलेल्या मौल्यवान गोष्टींपैकी एक हे लाकूड आहे.

The most expensive wood in the world african blackwood | जगातील सगळ्यात मौल्यवान लाकडांबाबत माहित्येय का? चंदनाच्या लाकडापेक्षाही १० पटीने महाग...

जगातील सगळ्यात मौल्यवान लाकडांबाबत माहित्येय का? चंदनाच्या लाकडापेक्षाही १० पटीने महाग...

googlenewsNext

काही झाडांची लाकडं जास्त महाग असतात तर काही दुर्मीळ. चंदनांची लाकडं सगळ्यात महाग आहेत असं समजलं जातं. ज्याची किंमत पाच ते सहा हजार रुपये प्रती किलोपर्यंत असते. पण तुम्हाला वाचून विश्वास बसणार नाही जगात एक असे देशी लाकूड आहे.

अफ्रीकी ब्लैकवुड की लकड़ी

ज्याची किंमत चंदनाच्या लाकडापेक्षा अनेकपट जास्त आहे. या लाकडाचे नाव आफ्रिकी ब्लॅकवुड असे आहे. धरतीवर असलेल्या मौल्यवान वस्तूंपैकी एक हे लाकूड आहे. या एक किलो वजनाच्या या प्रकारच्या लाकडाची किंमत  सात लाख रुपये आहे. या किंमतीत तुम्ही कोणीही व्यक्ती गाडी विकत घेऊ शकेल.

अफ्रीकी ब्लैकवुड (प्रतीकात्मक तस्वीर)

अफ्रिकी ब्लॅकवुड अन्य झाडांच्या तुलनेत खूप कमी दिसून येते. झाडांच्या दुर्मीळ प्रजातींमध्ये यांचा समावेश होतो. या झाडांची उंची जवळपास २५ ते ४९ फुट असते. ही झाडं मध्य आणि दक्षिण आफ्रिकेत दिसून येतात. कोरड्या वातावरणात  ही झाडं दिसून येतात. 

अफ्रीकी ब्लैकवुड की लकड़ी से बनी शहनाई

हे झाडं पूर्ण तयार होण्याासाठी जवळपास ६० वर्षांचा कालावधी लागतो. केनिया आणि टांझानिया अशा देशांमध्ये  या झाडांच्या लाकडाची अवैध तस्करी केली जाते. त्यामुळे झाडांची ही प्रजात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या झाडाच्या लाकडांचा वापर बासरी, सनई, गिटार यांसारखी वादय तयार करण्यासाठी केला जातो. तसंच टिकाऊ फर्निचर या झाडापासून तयार केलं जात पण त्याची किंमत खूपच जास्त असते. 

ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांनी कोरोना नियम मोडले, तर बॉसला होणार तुरुंगवास!

बापरे! काय सांगता, ‘या’ गावातील लोक करतायेत सापांची शेती; जगभरात गाजतंय गावाचं नाव!

Web Title: The most expensive wood in the world african blackwood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.