जगातील सर्वांत महागडा बर्गर 'The Golden Boy'!, किंमत ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 13:28 IST2021-07-12T13:27:08+5:302021-07-12T13:28:20+5:30
Most Expensive Burger in World : नेदरलँड्समधील एका फूड आउटलेटने या कोरोना संकट काळात एक नवीन आयडिया आणली आहे. या आउटलेटने अशा एक महागडा बर्गर आणला आहे, त्याची किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

जगातील सर्वांत महागडा बर्गर 'The Golden Boy'!, किंमत ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
Most Expensive Burger in World : कोरोनावर मात करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जगभरातील अनेक रेस्टॉसंट बिझनेसला मोठा फटका बसल्याचे दिसून आले. मात्र, नेदरलँड्समधील एका फूड आउटलेटने या कोरोना संकट काळात एक नवीन आयडिया आणली आहे. या आउटलेटने अशा एक महागडा बर्गर आणला आहे, त्याची किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. या बर्गरला 'द गोल्डन बॉय' (The Golden Boy) असे नाव देण्यात आले आहे.
युरो न्यूजच्या रिपोर्टनुसार या बर्गरची किंमत 5000 पौंड (जवळपास 4 लाख 47 हजार रुपये) ठेवण्यात आली आहे. या बर्गरच्या किंमतीत एक रोलेक्सचे घड्याळ खरेदी केले जाऊ शकते. दरम्यान, वुर्थुइजेन शहरातील डी डॉल्टन्स (De Daltons) या फूड आऊटलेटचे मालक रॉबर्ट जेन डी वीन यांनी सांगितले की "जागतिक विक्रम मोडण्याचे माझे लहानपणापासूनच एक स्वप्न होते आणि आता ते केल्यामुळे मला आश्चर्य वाटते."
जेन डी वीन यांच्या म्हणण्यानुसार, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या आर्काइव्हजवर सर्च करताना जगातील सर्वात महाग बर्गरचा रेकॉर्ड यापूर्वी अमेरिकेच्या ओरेगॉनमधील जूसीज ऑलटलॉ ग्रिल ग्रिल यांच्या नावावर आहे. या फूड आउटलेटने बनवलेल्या बर्गरची किंमत 4200 पौंड (सुमारे 3 लाख 72 हजार रुपये) होती. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार 2011 पासून या बर्गरच्या नावाने सर्वात महाग बर्गर असल्याचे रेकॉर्ड चालू आहे. जेन डी वीन म्हणाले, "त्या बर्गरचे वजन 352.44 किलो होते, अर्थात ते एका व्यक्तीसाठी नसते. त्यामुळे मला वाटले की मी यापेक्षा चांगले काम करू शकतो."
का आहे इतका महाग गोल्डन बॉय?
युरो न्यूजच्या रिपोर्टनुसार या बर्गरच्या बनमध्ये सोन्याचे पान आहे. याव्यतिरिक्त, ट्रफल (मशरूम), किंग क्रॅब, बेलुगा कॅव्हिआर (स्टर्जियन नावाच्या एका माशाची अविकसित अंडी), बदकाच्या अंड्यातील बलक आणि डोम पेरीग्नॉन शॅम्पेन याचा वापर हा बर्गर बनवण्यासाठी करण्यात आला आहे.