छोटे आणि अश्लील कपडे घातल्याने चर्चमधून बॅन झाली ही मॉडल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 15:40 IST2024-01-03T15:38:30+5:302024-01-03T15:40:33+5:30

हॉली जेन नावाच्या या महिलेची चूक फक्त इतकी होती की, तिने न्यू ईअर 2024 च्या पूर्वसंध्येला असे पकडे घालून फोटो शेअर केले.

Mormon model and Influencer banned from church over explicit snaps flashes underwear in hot dress | छोटे आणि अश्लील कपडे घातल्याने चर्चमधून बॅन झाली ही मॉडल

छोटे आणि अश्लील कपडे घातल्याने चर्चमधून बॅन झाली ही मॉडल

जगात असे अनेक धर्म आहेत ज्यांच्या नियमांना खास महत्व असतं. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना कठोर शिक्षाही केली जाते. ख्रिश्चनांचा एक समाज मॉर्मनचंही असंच आहे. यातील एका महिलेला नियमांचं उल्लंघन करणं महागात पडलं आहे आणि तिला चर्चसोबतच समाजातून बाहेर करण्यात आलं आहे.

हॉली जेन नावाच्या या महिलेची चूक फक्त इतकी होती की, तिने न्यू ईअर 2024 च्या पूर्वसंध्येला असे पकडे घालून फोटो शेअर केले ज्यात तिचं शरीर दिसत होतं. हॉलीचा हा अंदाज समाजातील काही लोकांना आवडला नाही. त्यानंतर जो निर्णय घेण्यात आला तो हैराण करणारा होता.

ब्लॉगर हॉली जेन इन्स्टा  इन्फ्लुएन्सर आहे. तिचे 197,000 फॉलोवर्स आहेत आणि सोशल मीडियावर ती नेहमीच बोल्ड फोटो-व्हिडीओ शेअर करत असते. 

मॉर्मन समाजाचे नियम किती कठोर आहेत याचा अंदाज यावरून घेता येतो की, केवळ अश्लील कंटेंटच नाही तर लग्नाआधी सेक्स आणि अश्लील भाषेवरही यात बंदी आहे.

आपलं स्पष्टीकरण देताना 39 वर्षीय हॉली म्हणाली की, ती काहीच चुकीचं करत नाहीये. सोशल मीडियावर व्हायरल एका व्हिडिओत हॉलीचा लूक फारच सुंदर दिसत आहे. फॅन्सही हॉलीचा हा अंदाज पाहून खूश झाले. 

Web Title: Mormon model and Influencer banned from church over explicit snaps flashes underwear in hot dress