९ पत्नींच्या पतीने बनवला अजब नियम, आता बाळासाठी बनवलं रोमान्सचं रोस्टर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 14:54 IST2022-05-17T14:50:28+5:302022-05-17T14:54:04+5:30
ब्राझीलमध्ये राहणारा आर्थर ओ उर्सो काही दिवसांपूर्वीच पत्नींसोबत रोमान्स करण्यासाठी रोस्टर बनवण्यावरून चर्चेत आला होता. पण रोमान्स रोस्टर बनवल्यावर त्याला स्वत:लाच समस्या होऊ लागली होती.

९ पत्नींच्या पतीने बनवला अजब नियम, आता बाळासाठी बनवलं रोमान्सचं रोस्टर
ब्राझीलमधील एका मॉडलला ९ पत्नी आहेत. ज्यासाठी तो जगभरात प्रसिद्ध आहे. तो गेल्या काही महिन्यांपासून सर्व पत्नींसोबत एकत्र राहत आहे. आता त्याला बाळ हवं आहे. यासाठी त्याने एक रूटीन बनवलं आहे. तो म्हणाला की, 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' बेसिसवर हे होईल.
ब्राझीलमध्ये राहणारा आर्थर ओ उर्सो काही दिवसांपूर्वीच पत्नींसोबत रोमान्स करण्यासाठी रोस्टर बनवण्यावरून चर्चेत आला होता. पण रोमान्स रोस्टर बनवल्यावर त्याला स्वत:लाच समस्या होऊ लागली होती. तो म्हणाला होता की, त्याच्यावर प्रेम करण्याचा दबाव निर्माण झाला. त्यानंतर त्याने रोमान्सच्या रोस्टरवर बंदी आणली. आता त्याने वडील बनण्याच्या आशेने नवी रूटीन बनवलं आहे.
असं असलं तरी आर्थर याचा गोष्टीचा निर्णय करू शकलेला नाही की, कोणत्या पत्नीकडून त्याला पहिलं बाळ हवं. तो म्हणाला की, कोणत्या पत्नीकडून पहिलं बाळ मिळतं याने काही फरक पडत नाही. बाळाचा सांभाळ सगळे मिळून प्रेमाने करतील.
आर्थर पुढे म्हणाला की, माझी एक फेवरेट वाइफ नाहीये. जिच्यासोबत मला बाळ हवंय. मला हे नॅच्युरल पद्धतीनेच होऊ द्यायचं आहे. ब्राझीलचा मॉडलने जेव्हा याबाबत आपल्या पत्नींना सांगितलं तेव्हा जास्त पत्नी यासाठी उत्सुक दिसल्या नाही. तर काही यासाठी फार उत्सुक दिसल्या.
आर्थर म्हणाला की, मला माहीत आहे की, घरात बाळ येईल तेव्हा सगळ्यांना ती सिच्युएशन समजेल. ज्यानंतर सर्वांना तो अनुभव घ्यावा वाटेल. पण सध्यासाठी फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह असंच राहणार.
याआधी आर्थरने त्याच्या पत्नींमधील ईर्ष्येबाबतही चर्चा केली होती. तेव्हा तो म्हणाला होता की, सर्वांमध्ये बॅलन्स ठेवणं ट्रिकी होऊ शकतं. अशीही चर्चा आहे की, त्याच्या एका पत्नीने घटस्फोट घेतला. आर्थरने एका पत्नीबाबत सांगितलं की, काही महिने तर सगळंकाही ठीक सुरू होतं. पण एक दिवस माझ्या एका पत्नीने मला बोलण्यासाठी बोलवलं. थेट सांगायचं तर आम्ही घटस्फोट घेतोय.