मॉडलला वाटलं सामान्य सर्दी झाली, एक्स-रे पाहून डॉक्टर म्हणाले - कधीही जाऊ शकतो जीव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 12:33 IST2025-01-03T12:33:24+5:302025-01-03T12:33:51+5:30

एका सामान्य तापानं तिच्या जीवनातील सगळ्यात मोठं रहस्य समोर आलं. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना तिच्या शरीरात जे दिसलं ते पाहून सगळेच हैराण झाले.

Model mistook symptoms for a cold but x ray exposed a surgical blunder | मॉडलला वाटलं सामान्य सर्दी झाली, एक्स-रे पाहून डॉक्टर म्हणाले - कधीही जाऊ शकतो जीव!

मॉडलला वाटलं सामान्य सर्दी झाली, एक्स-रे पाहून डॉक्टर म्हणाले - कधीही जाऊ शकतो जीव!

वेगवेगळ्या अजब आजारांच्या किंवा शरीरात काहीतरी वेगळंच सापडल्याच्या अनेक घटना अनेक समोर येत असतात. या घटना कधी हैराण करणाऱ्या तर कधी अचंबित करणाऱ्या असतात. एका तरूणीची अशीच कहाणी समोर आली आहे. रशियातील प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर एकातेरिना बदुलिनाला अजिबात अंदाज नव्हता की, एका सामान्य तापानं तिच्या जीवनातील सगळ्यात मोठं रहस्य समोर आलं. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना तिच्या शरीरात जे दिसलं ते पाहून सगळेच हैराण झाले.

हिवाळ्याच्या एका सकाळी एकातेरिनानं डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला. ताप आणि थंडीमुळे ती वैतागली होती. एकातेरिनाला असं वाटत होतं की, तिला न्यूमोनिया झाला. पण जे समोर आलं ते हैराण करणारं होतं. 

डॉक्टरांनी लगेच तिचा एक्स-रे केला. त्यात त्यांना जे दिसलं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. एकातेरिनाच्या फुप्फुसांमध्ये एका धातुचा तुकडा म्हणजे एक स्प्रिंग स्पष्टपणे दिसत होता. 

हा स्प्रिंग तिच्या फुप्फुसांमध्ये कसा गेला हे याचा तपास डॉक्टरांनी सुरू केला. तेव्हा समोर आलं की, हा तुकडा एकातेरिनाच्या ७ वर्षाआधीच्या सर्जरीचा भाग होता. २७ वर्षांची असताना एकातेरिनाला थ्रोम्बोएम्बोलिज्म झाला होता. ही एक अशी गंभीर स्थिती आहे, ज्यात रक्ताच्या गाठी तयार होतात. त्यावेळी डॉक्टरांनी तिचा जीव वाचवण्यासाठी ३३ ट्यूब्स लावल्या होत्या. पण कुणालाही अंदाज नव्हता की, त्या ट्यूब्समधील एक स्प्रींग तिच्या शरीरात तशीच राहील. 

डॉक्टरांनुसार, ही स्प्रिंग रक्ताच्या माध्यमातून फुप्फुसांपर्यंत जाऊन पोहोचली होती. या स्प्रिंगमुळे कधीही तिचा जीव जाऊ शकला असता. ती प्रत्येक श्वासासोबत मृत्यूच्या आणखी जवळ जात होती. 

डॉक्टरांचं हे बोलणं ऐकताच एकातेरिनाच्या डोळ्यासमोर अंधारी आली होती. पण एकातेरिना घाबरली नाही. तिने सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. अनेक तासांच्या मेहनतीनंतर डॉक्टरांनी तिच्या फुप्फुसांमधून स्प्रिंग काढली. ऑपरेशन यशस्वी ठरलं आणि एकातेरिनाचा जीव वाचला.

Web Title: Model mistook symptoms for a cold but x ray exposed a surgical blunder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.