एक किस की किमत तुम क्या जानो! 'तो' पोहोचला रुग्णालयात, 'ती' पोहोचली तुरुंगात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 17:18 IST2020-02-04T17:17:22+5:302020-02-04T17:18:50+5:30

मित्रावर रुग्णालयात उपचार सुरू; मैत्रिणीची तुरुंगात रवानगी

michigan woman accused of biting off part of friends tongue while kissing | एक किस की किमत तुम क्या जानो! 'तो' पोहोचला रुग्णालयात, 'ती' पोहोचली तुरुंगात

एक किस की किमत तुम क्या जानो! 'तो' पोहोचला रुग्णालयात, 'ती' पोहोचली तुरुंगात

मिशिगन: किस करताना जीभ चावल्याप्रकरणी महिलेला अटक करण्यात आल्याची धक्कादायक घटना अमेरिकेच्या मिशिगनमधल्या डेट्रॉईटमध्ये घडली आहे. महिलेनं किस करताना जीभ चावल्यानं तिचा मित्र जखमी झाला. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. महिलेनं जवळपास १ इंच जीभ चावल्याचं पोलिसांनी सांगितलं. यानंतर पोलिसांनी महिलेची रवानगी तुरुंगात केली. 

युलेट्टे वेडगेवर्थ नावाच्या ५२ वर्षीय महिलेनं किस करताना तिच्या मित्राची जीभ चावली. या प्रकरणी तिला १ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. मी माझ्या २७ वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच अशा प्रकारचा खटला पाहिल्याचं सरकारी वकील एरिक स्मिथ यांनी सांगितलं. 'युलेट्टे मंगळवारी तिच्या ६८ वर्षीय मित्राच्या घरी गेली होती. त्यावेळी त्यांनी एकमेकांना किस केलं. याला दोघांचीही संमती होती. त्यावेळी युलेट्टेनं तिच्या मित्राच्या जीभेचा चावा घेतला,' अशी माहिती स्मिथ यांच्या कार्यालयातून देण्यात आली.

युलेट्टेच्या मित्रानं घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर काही वेळातच पोलीस त्याच्या घरी दाखल झाले. त्यावेळी त्याच्या जिभेचा एक इंच भाग पोलिसांना बराच वेळ सापडला नाही. अखेर बेडरुममध्ये त्यांना जीभेचा तुकडा सापडला. पीडित आणि युलेट्टे एकमेकांचे जुने मित्र असल्याची माहिती स्मिथ यांच्या कार्यालयानं दिली. मात्र या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल दिलेली माहिती वेगवेगळी आहे. आपण डेट करत नसल्याचं युलेट्टेनं पोलिसांना सांगितलं. तर आपण डेट करत असल्याचा दावा पीडित मित्रानं केला. 

युलेट्टे तिच्या मित्राच्या घरी गेला असताना दोघं किस करत होते. त्यावेळी पीडित मित्रानं युलेट्टेच्या तोंडात जीभ घातली. युलेट्टेनं मित्राला तसं न करण्यास सांगितलं. त्यानंतर त्यांनी पुन्हा किस केलं. त्यावेळी मित्रानं पुन्हा जीभ तोंडात घातली. यानंतर युलेट्टेनं त्याच्या जीभेचा चावा घेतला. पीडित मित्राच्या तोंडातून रक्तस्राव सुरू झाल्यानं त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 
 

Web Title: michigan woman accused of biting off part of friends tongue while kissing