शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

जगातील एक असं गाव जिथे मनुष्यांसोबतच सगळे प्राणीही आहेत अंध, जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 11:07 AM

Mexico Blind Village:हे जगातलं असं रहस्यमय गाव आहे जिथे राहणारे लोकंच काय तर प्राणीही अंध आहेत.

Mexico Blind Village: जगात आजही अशी अनेक ठिकाणं आहेज ज्यांबाबत वाचून लोक हैराण होतात. या ठिकाणांबाबत वाचल्यावर लोकांना विश्वासही बसत नाही. आज आम्ही तुम्हाला जगातील एका वेगळ्याच गावाबाबत सांगणार आहोत. हे जगातलं असं रहस्यमय गाव आहे जिथे राहणारे लोकंच काय तर प्राणीही अंध आहेत.

जगातलं एकमेव अंधांचं गाव

मेक्सिकोमधील टिल्टेपक गावाला Village Of  Blind People म्हटलं जातं. म्हणजे अंध लोकांचं गाव. या गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत येथील प्राणीही अंध आहेत. यामागे काहीतरी मोठं रहस्य असल्याचं लोक मानतात. त्यामुळे प्रत्येकाला या गावाबाबत जास्तीत जास्त माहिती मिळवायची असते. 

जन्माला येताच काही दिवसात होतात अंध

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गावात जेपोटेक जमातीचे लोक राहतात.  एक रहस्य असही आहे की, टिल्टेपक गावात जेव्हा बाळ जन्म घेतं तेव्हा ते बाळ पूर्णपणे ठीक असतं. पण जन्माच्या काही दिवसांनंतर त्याच्या डोळ्याची दृष्टी जाते. नंतर ते बाळंही इतरांसारखं अंध होतं.

झाडाला मानतात कारण

गावात राहणारे लोक यासाठी एका झाडाला जबाबदार मानतात. गावातील लोकांचं मत आहे की, लावजुएला नावाच्या एका झाडाला पाहिल्यावर मनुष्यांसोबतच पशु-पक्षी सगळेच अंध होतात. मात्र, वैज्ञानिकांना हे मान्य नाही. वैज्ञानिकांचं मत आहे की लोकांच्या अंध होण्यामागे झाड नाही तर एक खतरनाक आणि विषारी माशी याचं कारण आहे.

वैज्ञानिक सांगतात की, एका खास प्रकारची विषारी माशी चावल्यानंतर लोकांच्या डोळ्यांच्या दृष्टी जाते. गावातील सगळेच लोक झोपड्यांमध्ये राहतात. या गावात साधारण ७० झोपड्या आहेत. यात साधारण ३०० लोक राहतात. हे सगळेच अंध आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे या लोकांच्या झोपड्यांना खिडक्याही नाहीत. असंही मानलं जातं की येथील काही लोकांच्या डोळ्यांची दृष्टी परत आली. त्यामुळे त्यांच्या मदतीने इतर लोकांना जगण्यात मदत होते.

टॅग्स :Mexicoमेक्सिकोJara hatkeजरा हटके