पत्नीसाठी जळत्या कोळशावर चालतात पुरुष, कारण ऐकून व्हाल चकीत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 18:25 IST2021-08-06T18:25:03+5:302021-08-06T18:25:13+5:30
China Pregnant Wife: कोळशावर चालून पत्नीचा त्रास कमी होईल, अशी मान्यता आहे.

पत्नीसाठी जळत्या कोळशावर चालतात पुरुष, कारण ऐकून व्हाल चकीत...
बीजिंग: आपल्या भारत देशात अनेक विचित्र आणि अघोरी प्रथा आहे. पण, अशा प्रथा फक्त आपल्याच देशात आहेत, असं नाही. तर, आपल्या शेजारील देश चीनमध्येही अनेक विचित्र प्रथा आहेत. यातील एक प्रथा म्हणजे, पुरुष आपल्या गरोदर पत्नीवरील प्रेम दाखवण्यासाठी जीवघेणं कृत्य करतात.
चीनी संस्कृतीमध्ये असलेल्या या प्रथेनुसार, पती आपल्या पत्नीवरील प्रेम दाखवण्यासाठी पत्नीला उचलून जळत्या कोळशावर चालतात. जळत्या कोळशावरुन चालणं बोलायला सोपं वाटत असलं तरी करायला अतिशय कठीण काम आहे. पण, चीनी पुरुष या प्रथेला महत्वाची मानतात. पती आपल्या आपल्या गरोदर पत्नीला उचलून या जळत्या कोळश्यावर चालला, तर त्याच्या पत्नीला लेबर पेन कमी होते, अशी चीनमध्ये मान्यता आहे.
गरोदरपनात महिलांना होतो त्रास
चीनी पुरुष सांगतात की, गरोदरपणात महिलेच्या शरीरात 9 महीन्यापर्यंत अनेक हॉर्मोंस तयार होतात. या हॉर्मोंसमुळे महिलांना मूड स्विंगसह अनेक त्रास सहन करावे लागतात. महिला पुरुषांना बाप होण्याचं सुख देतात, मग पत्नीच्या समस्या काही प्रमाणात कमी करण्यासाठी आम्ही एवढंही करू शकत नाहीत का ? जळत्या कोळश्यावर चालून आपल्या पत्नीवरील प्रेम आणि कोणत्याही परिस्थितीत पत्नीच्या सोबत असल्याचं दाखवण्यासाठी चीनी पुरुष ही प्रथा पूर्ण करतात.