२७ वर्षाची समजून ४ वर्षांपासून डेटिंग करत होता तरूण, खरं वय समजल्यावर बसला मोठा धक्का....
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 13:23 IST2025-04-18T13:22:46+5:302025-04-18T13:23:53+5:30
Viral News : एका तरूणानं अलिकडेच त्याच्या गर्लफ्रेन्डबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. तरूण म्हणाला की, त्याची गर्लफ्रेन्ड नेहमीच तिचं वय २७ सांगत होती.

२७ वर्षाची समजून ४ वर्षांपासून डेटिंग करत होता तरूण, खरं वय समजल्यावर बसला मोठा धक्का....
Viral Reddit Post: प्रेमात मिळणारा दगा, नात्यातील खोटेपणा, एकमेकांपासून लपवलेल्या गोष्टी कपल्सच्या अशा धक्कादायक घटना नेहमीच समोर येत असतात. एका तरूणानं अलिकडेच त्याच्या गर्लफ्रेन्डबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. तरूण म्हणाला की, त्याची गर्लफ्रेन्ड नेहमीच तिचं वय २७ सांगत होती. म्हणजे ती तिची जन्मतारीख एप्रिल १९९८ सांगत होती. पण जेव्हा लॅपटॉपमध्ये चुकून तिच्या लॅपटॉपमध्ये तिच्या पासपोर्टचा फोटो पाहिला तर त्याला धक्काच बसला. कारण त्यात तिच्या जन्माचं वर्ष १९७७ होतं म्हणजे ती ४७ वर्षाची होती.
तरूणानं त्याच्यासोबत घडलेली ही घटना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर शेअर केली आणि आता काय करावं याबाबत त्यानं लोकांकडे सल्ला मागितला आहे. त्यानं लिहिलं की, 'मी २६ वर्षांचा आहे आणि चार वर्षांपासून गर्लफ्रेन्डसोबत आहे. गर्लफ्रेन्डनं नेहमीच सांगितलं की, ती १९९८ मध्ये जन्माला आली होती. पण तिच्या पासपोर्टवर १९७७ साल लिहिण्यात आलं आहे. आता काय करावं असा प्रश्न मला पडला आहे'.
तरूणानं सांगितलं की, त्याची गर्लफ्रेन्ड दिसायला २७ वर्षाची वाटते. त्यामुळे संशय घेण्याचं काही कारणंच नव्हतं. पण आता त्याला काही गोष्टी आठवत आहेत. त्याची गर्लफ्रेन्ड तिची त्वचा आणि लुक्सबाबत खूप संवेदनशील होती. गर्लफ्रेन्डचे सगळे मित्र ३० ते ४० वयाचे होते. पण तिनं कधीच त्यांच्यासोबत भेट घालून दिली नाही.
तरूणाला गर्लफ्रेन्डच्या लॅपटॉपमध्ये प्रेग्नेन्सी टेस्टचा एक फोटोही दिसला दिसला. जो त्याच्यासोबत भेटण्याच्या काही महिन्यांआधीचा होता. पण तिनं कधीच प्रेग्नेन्सीबाबत काही सांगितलं नाही. जेव्हा तो तिचं आयडी किंवा पासपोर्ट बघण्याचा विषय काढत होता, तेव्हा ती टाळत होती. आता या गोष्टींमुळे तो चिंतेत आहे.
रेडिटवरील यूजरनं त्याला नातं संपवण्याचा सल्ला दिला आहे. एका यूजरनं लिहिलं की, 'ती पुन्हा पुन्हा खोटं बोलत आहे. काय लपवत आहे माहीत नाही'. तर दुसऱ्यानं लिहिलं की, 'हे धक्कादायक आहे. ती आणखी मोठं खोटं बोलू शकते. वाद न घालता नातं तोडून टाक'. तर काही लोकांनी त्याला तिच्यासोबत शांतपणे बोलण्याचा सल्ला दिला.
तर एका यूजरनं लिहिलं की, गर्लफ्रेन्ड कोरियन आहे आणि आणि एशियन लोक अनेकदा कमी वयाचे दिसतात. तो म्हणाला की, 'ती २७ ची दिसत नाही, कदाचित तिनं सर्जरी केली असेल. कोरियन लोक सुंदरतेबाबत खूप संवेदनशील असतात'.