शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

बोंबला! बॉयफ्रेन्डवर पैसे उडवण्यासाठी तरूणी झाली चोर, सेफमधून दोन लाख लंपास!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 5:06 PM

आपण अनेकदा अशा बातम्या वाचल्या असतील ज्यात मुलं प्रेयसीसाठी महागडे गिफ्ट घेण्यासाठी चोरी करताना पकडले गेले.

(Image Credit : Hindustan)(प्रतिकात्मक फोटो)

आपण अनेकदा अशा बातम्या वाचल्या असतील ज्यात मुलं प्रेयसीसाठी महागडे गिफ्ट घेण्यासाठी चोरी करताना पकडले गेले. अनेकदा तर अनेक गुन्हेगारांनी गुन्हेगारीच्या दलदलीत अडण्याला प्रेम जबाबदार असल्याचंही म्हटलं आहे. पण यूपीच्या मेरठमध्ये याच्या उलट एक घटना समोर आली आहे. इथे एक तरूणी तिच्या बॉयफ्रेन्डवर पैसे खर्च करण्यासाठी चोर झाली.

हिंदुस्थान डॉट कॉमने दिलेल्या रिपोर्टनुसार, ही तरूणी मेरठच्या गोविंद प्लाझा येथील एका फायनान्स कंपनी ऑफिसमध्ये काम करत होती. दोन महिन्यांपूर्वी या ऑफिसमध्ये तिला असिस्टंट पदावर नोकरी देण्यात आली होती. आणि जेव्हापासून या ऑफिसमध्ये ती जॉइन झाली तेव्हापासूनच ऑफिसच्या सेफमधून रक्कम गायब होत होती.

फायनान्स कंपनीचे मालक लक्की सेठने रविवारी काही रोख रक्कम सेफमध्ये ठेवली होती. पण काही तासांनी त्यांनी ती रक्कम मोजली तर त्यात ४५०० रूपये कमी आढळले. त्यांनी असिस्टंटला विचारपूस केली तर ती काही बरोबर उत्तर देऊ शकली नाही. हा पैसे गायब होण्याचा प्रकार दोन महिन्यांपासूनच सुरू होता. त्यामुळे पोलिसांना बोलवण्यात आलं.

(प्रतिकात्मक फोटो)

पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तरूणीला ताब्यात घेतलं. विचारपूस केल्यावर तरूणीने कबूल केलं की, तिने सेफची एक डुप्लिकेट चावी तयार करून ठेवली होती. तरूणीने सांगितले की, मालक ऑफिसमधून बाहेर गेले की, ती सेफमधून पैसे चोरी करत होती. अशाप्रकारे दोन महिन्यात तिने पावणे दोन लाख रूपयांची चोरी केली.

पोलिसांनी आणखी विचारपूस केल्यावर तिने सांगितले की, ती ही रक्कम तिच्या बॉयफ्रेन्डवर खर्च करत होती. इतकेच नाही तर सेफची चावी सुद्धा तिने तिच्या बॉयफ्रेन्डच्या मदतीने तयार केली होती. पोलिसांनी तरूणीवर गुन्हा दाखल करून घेतला आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी