मुक्या जनावरांना मदत करणारा खऱ्या आयुष्यातील बॅटमॅन!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 11:48 AM2019-07-15T11:48:49+5:302019-07-15T11:52:05+5:30

अनेक सिनेमांमध्ये तुम्ही सुपरहिरोंना गरीब लोकांची मदत करताना पाहिलं असेल. पण खऱ्या आयुष्यातही एक असाच सुपरहिरो आहे.

Man who dresses up like batman to save shelter animals find them loving families | मुक्या जनावरांना मदत करणारा खऱ्या आयुष्यातील बॅटमॅन!

मुक्या जनावरांना मदत करणारा खऱ्या आयुष्यातील बॅटमॅन!

googlenewsNext

अनेक सिनेमांमध्ये तुम्ही सुपरहिरोंना गरीब लोकांची मदत करताना पाहिलं असेल. पण खऱ्या आयुष्यातही एक असाच सुपरहिरो आहे. फ्लोरिडाचा २७ वर्षीय क्रिस वॅन मुक्या जनावरांसाठी सुपरहिरोपेक्षा कमी नाही. क्रिस नेहमीच बॅटमॅनच्या पोशाखात दिसतो आणि जनावरांना मदत करण्यासोबतच त्यांना घरीही पोहोचवत आहे. दुसऱ्यांनी सुद्धा असं करावं म्हणून त्याने हा पोशाख निवडला आहे. जेणेकरून तो वेगळा दिसावा आणि जगातील लोकांपर्यंत संदेश पोहोचावा.

मदतीसाठी फोन-ईमेलचा पाऊस

क्रिसने याची सुरूवात जनावरांची मदत करणाऱ्या एका संस्थेतून वॉलेंटिअर म्हणून केली होती. २०१८ मध्ये क्रिसने जनावरांच्या मदतीसाठी बॅटमॅन फॉर पॉज या संस्थेची सुरूवात केली. या माध्यमातून त्याने अनेक जनावरांचा जीव वाचवला आणि त्यांचं घर शोधून त्यांना घरी पोहोचवलं. जर त्या जनावरांची घरे नसतील किंवा कुणी मालक नसेल तर ही जनावरे दुसऱ्या लोकांना सोपवली जातात.

जनावरांना आणणे आणि घेऊन जाणे यासाठी क्रिस त्याच्या होंडा अकॉर्डचा वापर करतो. पण त्याला एका अशा व्यक्तीचा शोध आहे, जी या कामासाठी एखादी मोठी गाडी दान करू शकेल. क्रिसनुसार,  बालपणी मी जेव्हा सुपरहिरो सिनेमे बघायचो तेव्हा मलाही लोकांच्या मदतीसाठी त्यांच्यासारखं होण्याची इच्छा व्हायची. त्यामुळे मी हा मार्ग निवडला.

कधी करतो काम?

बॅटमॅनकडे ई-मेल, फोन आणि सोशल मीडियाच्या मदतीने जनावरांना वाचवण्याची रिक्वेस्ट येतात. त्यामुळे क्रिस जनावरांच्या मालकांना शोधण्याचं काम वीकेंडलाही करतो. तर जनावरांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम सोमवार, मंगळवार आणि बुधवारी या दिवसात करतो.

अधिक मदतीसाठी क्राउडफिंडिंग

क्रिसच्या घरापासून ५०० मैल परिसरात हे काम करण्याला क्रिस प्राथमिकता देतो. कारण वाहतुकीच्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशात सुविधा वाढवत्या याव्यात, यासाठी तो क्राउडफंडिंग करत आहे.

Web Title: Man who dresses up like batman to save shelter animals find them loving families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.