मरता मरता वाचला या बिचाऱ्याचा जीव, असा काही झाला आगीचा स्फोट की तुम्ही हादरुन जाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 19:26 IST2021-07-29T18:45:02+5:302021-07-29T19:26:03+5:30

अनेक असे अपघात असतात जे माणसाला अचंबित करायला लावतात. अशा दुर्घटनांसमोर माणूस हतबल होतो कारण त्याला कंट्रोल करणं काही माणसाच्या हातात नसतं. काही अपघात तर असेच चित्रविचित्र असतात. त्यांच कारणं नेमकं काय हे त्या घटना पाहिल्यावर समजतच नाही. असाच एक विचित्र अपघात अमेरिकेतील सेंट ऐलबंस क्वीन्स येथे झालाय. या अपघातात एक माणूस मरता मरता वाचलाय...

Man was going to pay phone bill, sudden blast at the road side | मरता मरता वाचला या बिचाऱ्याचा जीव, असा काही झाला आगीचा स्फोट की तुम्ही हादरुन जाल

मरता मरता वाचला या बिचाऱ्याचा जीव, असा काही झाला आगीचा स्फोट की तुम्ही हादरुन जाल

अनेक असे अपघात असतात जे माणसाला अचंबित करायला लावतात. अशा दुर्घटनांसमोर माणूस हतबल होतो कारण त्याला कंट्रोल करणं काही माणसाच्या हातात नसतं. काही अपघात तर असेच चित्रविचित्र असतात. त्यांच कारणं नेमकं काय हे त्या घटना पाहिल्यावर समजतच नाही. असाच एक विचित्र अपघात अमेरिकेतील सेंट ऐलबंस क्वीन्स येथे झालाय. या अपघातात एक माणूस मरता मरता वाचलाय...

तुम्ही बघु शकता की एक माणूस रस्त्यावरून जात आहे. अचानक रस्त्याच्या एका कोपऱ्यातून धुर यायला लागतो आणि मग जोराचा स्फोट होतो. आगीचे लोट पसरतात. काही क्षणात आजूबाजूच्या वस्तू पेट घेतात. ती व्यक्तीही त्यात गंभीररित्या जखमी होते.

या व्यक्तीचे नाव बेरी वेस्ट आहे आणि ते ५७ वर्षाचे आहेत. ते त्यांच्या फोनचे बिल भरायला चालले होते. या घटनेनंतर त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि आता त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जेफ या युजरने हा व्हिडिओ ट्वीटरवर पोस्ट केला आहे. याला १३ लाखापेक्षा अधिक व्हिव्ज मिळाले आहेत.

Web Title: Man was going to pay phone bill, sudden blast at the road side