पाइल्सचं दुखणं दूर करण्यासाठी व्यक्तीनं केला अजब जुगाड, एक्स-रे पाहून डॉक्टर 'कोमात'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 15:08 IST2025-02-08T15:07:36+5:302025-02-08T15:08:14+5:30
सर्जरीद्वारे डॉक्टरांनी व्यक्तीच्या पार्श्वभागातून १२ सेंटीमीटर लांब स्टीलचा ग्लास बाहेर काढला. जो आतड्यांमध्ये अडकला होता.

पाइल्सचं दुखणं दूर करण्यासाठी व्यक्तीनं केला अजब जुगाड, एक्स-रे पाहून डॉक्टर 'कोमात'!
पटण्याच्या वैशाली जिल्ह्यातील महानार गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका ४५ वर्षीय व्यक्तीच्या पोटात वेदना, बद्धकोष्ठता आणि ब्लीडिंगच्या समस्येमुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. जेव्हा डॉक्टरांनी त्याला चेक केलं तर रिपोर्ट बघून तेही हैराण झाले. व्यक्तीची स्थिती गंभीर असल्यानं त्याच्यावर सर्जरी करण्यात आली. सर्जरीद्वारे डॉक्टरांनी व्यक्तीच्या पार्श्वभागातून १२ सेंटीमीटर लांब स्टीलचा ग्लास बाहेर काढला. जो आतड्यांमध्ये अडकला होता.
या रूग्णाचा जीव वाचवण्यात डॉक्टरांनी महत्वाची भूमिका बजावली. रूग्णाला सतत पोटात वेदना होत होत्या, बद्धकोष्ठतेची आणि ब्लीडिंगची समस्या होती. सोबतच त्याचं पोट फुगलं होतं. अनेक दिवसांपासून पोट साफ न झाल्यानं कुटुंबिय त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते.
पार्श्वभागातून काढला स्टीलचा ग्लास
अल्ट्रासाउंड रिपोर्टमधून समोर आलं की, गुदद्वारात एक स्टीलचा ग्लास अडकलेला आहे. ज्यामुळे त्याला त्रास होत आहे. डॉक्टरांना ग्लास दिसल्यावर त्यांनी लगेच सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. २ तासांच्या सर्जरीनंतर १२ सेंटीमीटर लांब ग्लास बाहेर काढला. आता रूग्णाची स्थिती सामान्य आहे.
केला धक्कादायक खुलासा
जेव्हा एक्स-रे रिपोर्टमध्ये डॉक्टरांना रूग्णाच्या शरीरात ग्लास दिसला तर त्यांनी त्याला विचारलं की, हे कसं झालं? आधी रूग्णानं खरं सांगणं टाळलं. डॉक्टरांनी त्याला पुन्हा विचारलं तेव्हा त्यानं सांगितलं. रूग्ण म्हणाला की, अनेक दिवसांपासून पाइल्स आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येमुळे तो वैतागला होता. शौच करण्यास समस्या होत असल्यानं त्यानं ग्लास गुदद्वारात टाकला, जेणेकरून आराम मिळावा.
डॉक्टरांनी सांगितलं की, रूग्णांची मानसिक स्थिती पूर्णपणे सामान्य आहे. तरीही त्यानं हे धक्कादायक पाउल उचललं. सध्या सर्जरीनंतर त्याची स्थिती स्थिर आहे आणि तो बरा होत आहे.