मेहुणीचं लग्न जुळलं तर रडू लागला होता भाओजी, नात्याबाबत समजल्यावर हैराण झाली पत्नी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 16:09 IST2022-07-29T16:09:09+5:302022-07-29T16:09:25+5:30

Relationship : तिने लिहिलं की, 'बालपणी माझी बहीण माझी प्रोटेक्टर आणि रोल मॉडल होती. जेव्हा आमचे सावत्र वडील नशेत राहत होते, तेव्हा ती समोर येत होती. जेणेकरून मला काही इजा होऊ नये.

Man tells his pregnant wife he is in love with her sister | मेहुणीचं लग्न जुळलं तर रडू लागला होता भाओजी, नात्याबाबत समजल्यावर हैराण झाली पत्नी!

मेहुणीचं लग्न जुळलं तर रडू लागला होता भाओजी, नात्याबाबत समजल्यावर हैराण झाली पत्नी!

Relationship : सोशल मीडियावर एका महिलेची पोस्ट व्हायरल झाली आहे. ज्यात तिने तिच्या पतीने दारूच्या नशेत खळबळजनक खुलासा केल्याचं सांगितलं. महिलेने लिहिलं की, पतीने दारूच्या नशेत सांगितलं की, तो माझ्या मोठ्या बहिणीवर प्रेम करतो. तेही अशावेळी हे सांगितलं जेव्हा महिला प्रेग्नेंट आहे आणि तिचा सहावा महिना सुरू आहे.

20 जून रोजी रेडीटवर r/trueoffmychet फोरमच्या माध्यमातून u/ThrowRavin ने सांगितलं की, तिच्या बहिणीच्या एंजेगमेंटनंतर पतीचं वागणं बदललं होतं आणि त्याने एक मोठा खुलासा केला. पोस्टमध्ये महिलेने सांगितलं की, बालपणी अनेक अडचणीतून दिवस काढल्याने ती आणि तिची मोठी बहिणी एकमेकींच्या फार जवळ होत्या. 

तिने लिहिलं की, 'बालपणी माझी बहीण माझी प्रोटेक्टर आणि रोल मॉडल होती. जेव्हा आमचे सावत्र वडील नशेत राहत होते, तेव्हा ती समोर येत होती. जेणेकरून मला काही इजा होऊ नये.

जेव्हा ती कॉलेजमध्ये गेली तेव्हा कधी कधी मी घरातून पळून जाऊन तिच्याजवळ पोहोचत होते. त्या दिवसांमध्ये ती खाली झोपत होती आणि मला बेडवर झोपू देत होती. 16 वर्षांची असताना मी माझ्या बहिणीसोबत शिफ्ट झाले आणि त्यानंतर आम्ही कधीच घरी परत गेलो नाहीत'.

पोस्टमध्ये महिलेने लिहिलं की, तिची बहीण आणि पतीचा स्वभाव, आवडी-निवडी एकसारख्या आहेत. परिवारात सगळं काही ठीक सुरू होतं. पण मग माझ्या बहिणीने एका व्यक्तीला डेट करणं सुरू केलं होतं. ही बाब महिलेच्या पतीला आवडली नाही. तो पत्नीला म्हणाला की, मला वाटतं की, हा व्यक्ती तुझ्या बहिणीसाठी ठीक नाही.

एकेदिवशी चारही लोक एकत्र डिनरसाठी गेले. इथे महिलेच्या बहिणीला तिच्या बॉयफ्रेन्डने प्रपोज केलं. जेव्हा सगळे परतले तेव्हा महिलेचा पती एका रूममध्ये जोरजोरात रडत होता. महिलेने सांगितलं की, माझ्या पतीने सांगितलं की, तो माझ्या बहिणीवर अनेक वर्षांपासून प्रेम करतो. पण त्याला हेही माहीत आहे की, हे किती चूक आहे.

महिला पुढे म्हणाली की, पती म्हणाला होता की, त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्याने प्रॉमिस केलं होतं की, तो एक चांगला पती बनणार आणि  एका चांगला पिताही बनणार.

Web Title: Man tells his pregnant wife he is in love with her sister