पत्नीला 8 महिन्यात गिफ्ट केल्या कोट्यावधी रूपयांच्या दोन फरारी कार, कारण वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 09:42 IST2024-01-19T09:40:19+5:302024-01-19T09:42:00+5:30

ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने पत्नीला असं गिफ्ट दिलं आहे जे ती आयुष्यभर विसरणार नाही.

Man splashed cash to gift for wife by Ferrari like supercars told she deserves it | पत्नीला 8 महिन्यात गिफ्ट केल्या कोट्यावधी रूपयांच्या दोन फरारी कार, कारण वाचून व्हाल अवाक्

पत्नीला 8 महिन्यात गिफ्ट केल्या कोट्यावधी रूपयांच्या दोन फरारी कार, कारण वाचून व्हाल अवाक्

असं म्हटलं जातं की, एका यशस्वी पुरूषामागे एका महिलेचा हात असतो. कारण ती सुद्धा त्याना यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत करते. पडद्यामागे राहून पुढे जाण्यासाठी पूर्ण ताकद लावते. पण अनेकदा त्यांना त्याचं श्रेय दिलं जात नाही ज्यावर त्यांचा अधिकार असतो. मात्र, ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने पत्नीला असं गिफ्ट दिलं आहे जे ती आयुष्यभर विसरणार नाही.

डेली स्‍टारच्या रिपोर्टनुसार, दिवंगत पॉप स्टार मायकल जॅक्सनचा माजी बॉडीगार्ड आणि सेल्फ डिफेंस एक्‍सपर्ट मॅट फिडेस (Matt Fiddes) आपल्या पत्नीला तिच्या मेहनतीचं बक्षीस म्हणून असं गिफ्ट दिलं ज्याची चर्चा होत आहे. स्वत:च्या मेहनतीने कोट्याधीश बनलेल्या मॅटने पत्नी मोनिकेला 8 महिन्यात 2 फरारी कार गिफ्ट केल्या. त्याला या गाड्यांची इतकी आवड आहे की, जेव्हाही नवीन गाडी लॉंच होते तो खरेदी करतो. सोबतच त्याने तिला कोट्यावधी रूपयेही दिले आहेत.

मॅट म्हणाला की, मोनिकेचा हा हक्क आहे. ती माझ्या वेडसर विश्वास राहते. मला सहन करते. माझ्या 6 मुलांचा सांभाळ करते. सोबतच आमच्या कंपनी चालवण्यासाठी दिवसभर फोनवर बोलत असते. ती एक अद्भुत आई, अद्भुत पत्नी आहे. तिच्यामुळे मी सेल्फ मेड मिलेनिअर बनू शकलो. मॅटने नुकतीच पत्नीला 3.37 कोटी रूपयांची पिवळ्या रंगाची फरारी गिफ्ट केली.

याआधीही त्याने आपल्या लग्नाच्या 11व्या वाढदिवसावेळी फरारी गिफ्ट केली होती. गेल्या आठ महिन्यात त्याने पत्नीसाठी सुपर कार घेण्यावर 600000 पाउंड पेक्षाही जास्त पैसे खर्च केले. त्याच्याकडे एक नवीन V क्लास मर्सिडीज कारही आहे. आता त्याच्याकडे 4 फरारी कार झाल्या आहेत. 100 पाउंडमध्ये आपला मार्शल आर्ट व्यवसाय सुरू करणारा मॅट फिडेच आता 120 मिलियन पाउंड संपत्तीचा मालक आहे.

Web Title: Man splashed cash to gift for wife by Ferrari like supercars told she deserves it